खरं तर, ज्यांना पोहायचं आहे ते पाण्यावर आरामात झोपू शकतात. पाणी कितीही खोल असले, तरी हातपाय न मारताही आपले शरीर कसे हाताळायचे हे चांगल्या पोहणाऱ्याला कळते, पण ज्यांना पोहायचे नाही ते पाण्यावर तरंगू शकतात का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस पाण्यात शिरतो आणि आरामात झोपतो, जणू काही तो त्याच्या पलंगावर आडवा पडला आहे. हा व्हिडिओ पाहण्यास जितका सुंदर आहे तितकाच आश्चर्याकारकही आहे.
तलावात तरंगतोय हा व्यक्ती
हा व्हिडिओ Fascinating नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये पाण्याचा सुंदर तलाव दिसत आहे. हे तलाव चारही बाजूंनी काळ्या मातीने वेढलेले आहे, ते पाहून असे वाटते की, हा सपाट प्रदेश आहे, बहुधा काळ्या मातीने वेढलेला असावा. मध्यभागी हा तलाव आहे ज्याचे पाणी स्वच्छ आहे आणि खूप खोल आहे. आजूबाजूच्या पांढऱ्या भिंती पाण्यात स्पष्ट दिसतात यावरून पाणी किती स्वच्छ आहे, याचा अंदाज येतो. एक व्यक्ती या तलावात उतरते आणि हात पाय पसरून अगदी आरामात झोपते. ती अजिबात पोहण्याचा प्रयत्न करत नाही, आणि बुडत नाही.
हेही वाचा – दोन तास घ्या पण ‘या’ फोटोतील दुसरा Giraffe शोधून दाखवा! ९८ टक्के लोक ठरले अपयशी
हे विज्ञान काय आहे?
हा व्हिडिओ शेअर करताना फेसिनेटिंग ट्विटर हँडलने या आश्चर्याचे कारणही दिले आहे. व्हिडिओसोबत लिहिलेल्या कॅप्शननुसार, हे इजिप्त येथी सिवा ओएसिसचे दृश्य आहे, या पाण्यात ९५ टक्के मीठ आहे, ज्यामुळे पाण्याची घनता इतकी वाढते की कोणीही त्यात बुडत नाही. या कॅप्शनवर एका यूजरने कमेंट केली आहे की, इतके मीठ असेल तर न बुडूनही नुकसान होऊ शकते. काही युजर्सना हे दृश्य खूप सुंदर वाटले आहे. एका यूजरने लिहिले की, ‘हे खूप रिफ्रेशिंग आहे.’ एका यूजरने विचारले, ‘जास्त वजन असलेले लोकही हे करू शकतात का?’