ज्वालामुखी जगातील सर्वात धोकादायक गोष्टींपैकी एक आहे. यांना एकप्रकारे झोपलेल्या राक्षसांप्रमाणे म्हणता येईल. म्हणजे ते जेव्हा झोपतात तेव्हा फक्त झोपूनच राहतात. परंतु, जेव्हा ते जागे होतात तेव्हा मात्र ते मोठा विनाश करतात. जगभरात शेकडो ज्वालामुखी आहेत, परंतु त्यापैकी फक्त काही सक्रिय आहेत. म्हणजेच ते नेहमी उद्रेक होत असतात आणि लावा बाहेर टाकत असतात. यामधून निघणाऱ्या लावा इतक्या धोकादायक असतात की त्यामुळे एका क्षणात मानवी हाडे देखील वितळू शकतात. तसंच, काही ज्वालामुखी खूप शांत असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये कोणतीही हालचाल नसते. आजकाल अशाच एका ज्वालामुखीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात शांत असलेल्या ज्वालामुखीला एक व्यक्ती दगडफेक करून जागे करतो. त्यानंतर जे दृश्य पाहायला मिळते, ते सर्वांनाच आश्चर्यचकित करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन लोक एका उंच टेकडीच्या शिखरावर उभे आहेत आणि ते एकत्र एक छोटासा दगड खाली फेकतात. वास्तविक, खाली एक शांत ज्वालामुखी आहे की त्याला पाहून ज्वालामुखी आहे हे कळत देखील नाही. पण दगड खाली पडताच ज्वालामुखी आपले भयंकर रूप धारण करून लावा उधळू लागतो.

( हे ही वाचा: ‘औषधाच्या पॅकेटवर’ छापलेले लग्नाचे आमंत्रण तुम्ही कधी पाहिलंय का? नसेल तर एकदा पहाच)

दगड फेकताच ज्वालामुखीचे रौद्र रूप एकदा पाहाच

( हे ही वाचा: Optical Illusion: या फोटोमध्ये लपलेले किती चेहरे तुम्हाला दिसले? ९ सापडल्यास तुम्ही ठराल जिनियस)

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर Biltek Videos नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या २३ सेकंदांचा हा व्हिडिओ असून आतापर्यंत ३.८ मिलियन म्हणजेच ३८ लाख वेळा पाहिला गेला आहे. तसंच हा व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man made mistake of throwing a stone into a quiet volcano watch this terrifying video of the eruption gps
Show comments