बऱ्याच लोकांना मसालेदार मोमोज खायला खूप आवडतात. भाज्या आणि चिकनपासून बनवले जाणारे हे मसालेदार मोमोज ग्रीन चटणीबरोबर खाण्याची एक वेगळी मज्जा असते. विशेषत: तरुणांना मोमोजचे विविध प्रकार चाखायला आवडतात. त्यामुळे हल्ली शाळा, कॉलेज ते अगदी स्टेशनबाहेरील खाऊ गल्लीत तुम्हाला एकतरी मोमोजचा स्टॉल दिसून येईल. विविध आकारात हे मोमोज तयार केले जातात. पण, एका पठ्ठ्याने मोमोजला आकार देण्यासाठी अशी ट्रीक वापरली आहे जी पाहून तुम्ही मोमोज खाताना १०० वेळा विचार कराल. त्याची मोमोज बनवण्याची पद्धत पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओत एक व्यक्ती मोमोजला आकार देण्यासाठी चक्क आजोबांच्या नकली प्लास्टिकच्या दातांचा वापर करत असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मोमोज बनवताना दिसत आहे. या व्यक्तीची मोमोज बनवण्याची पद्धत सामान्य पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आणि अनोखी आहे. कारण त्याने मोमोजला आकार देण्यासाठी चक्क त्याच्या आजोबांच्या नकली प्लास्टिकच्या दातांचा वापर केला आहे. यासाठी तो प्रथम दातांच्या खालच्या भागावर पीठापासून लाटलेली गोल पोळी ठेवतो. यानंतर त्यात स्टफिंग करतो आणि नंतर दातांच्या वरच्या भागाच्या मदतीने तो दाबतो. अशा प्रकारे तो मोमोजला आकार देत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ wqbestfriends_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे – हा कसला किळसवाणा प्रकार आहे? आता जेव्हा मी मोमोज खाईन तेव्हा मला ते आठवत राहील; तर दुसर्‍या युजरने लिहिले की, आता मोमोज खाण्यापूर्वी मला विचार करावा लागेल की, ते कसे बनवले जातात?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man made momos with help of grandfathers fake teeth netizens were shocked to see unique method in viral video sjr
Show comments