अंकिता देशकर
Rainy Season Viral Business Idea: लाइटहाऊस जर्नालिझमला ट्विटरवर पोस्ट केलेला व्हिडिओ समोर आला. या व्हिडीओमध्ये एक माणूस एका भन्नाट व्यवसायातून लोकांची मदत करताना दिसतोय. जुगाडू काका असं म्हणत अनेकांनी हा व्हिडीओ डोक्यावर घेतला आहे तर काहींनी यावर सडकून टीका सुद्धा केली आहे. नेमका हा व्हिडीओ काय आहे? यासंदर्भातील व्हायरल दावे किती खरे, किती खोटे आहेत हे पाहूया…
तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक जुगाडू मनुष्य रस्त्याच्या पलीकडे एका पुश कार्टमधून लोकांना घेऊन जाताना दिसत आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर जेव्हा डबकी तयार होतात, पाणी साचतं, तेव्हा रस्ता ओलांडताना चप्पल, शूज खराब होतील याची अनेकांना चिंता असते. अशावेळी ही व्यक्ती हातगाडीसारख्या एका फळीवरून त्यांना रस्ता ओलांडायला मदत करते. हा व्हिडिओ भारतातील असल्याचा दावा करण्यात आला आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Jayanti Ghosh, ने व्हायरल व्हिडिओ शेअर करत दावा केला कि तो भारताचा व्हिडिओ आहे.
इतर यूजर हि लिंक किंवा याचा स्क्रीनशॉट शेअर करत हा दावा फेसबुक वर शेअर करत आहेत.
तपास:
आम्हाला आढळले की ट्विटमध्ये एक संदर्भ जोडला गेला आहे. हा संदर्भ ‘द इंडियन एक्सप्रेस’ वर प्रकाशित एका आर्टिकलचा होता, हे आर्टिकल सप्टेंबर १८, २०२२ रोजी प्रकाशित झाले होते.
या रिपोर्टमध्ये म्हंटले होते की, कोलंबियातील बॅरनक्विला येथे एका व्यक्तीने रस्त्यावरून लोकांना एका पुश कार्टवर नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.आम्ही व्हिडिओमधील कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज शोध वापरून व्हायरल व्हिडिओबद्दल देखील शोधले.आम्हाला rcnradio.com वर प्रकाशित एक रिपोर्ट सापडला.
हे आर्टिकल स्पॅनिश मध्ये होते,आम्हाला या लेखातील घटनेबद्दल एक ट्विट आणि पोस्ट केलेला व्हिडिओ देखील सापडला.
आम्हाला इंडिया टाइम्स, एनडीटीव्ही, न्यूज १८ या साईट्सवर सुद्धा या संदर्भातील अनेक लेख आढळून आले.
अनेक युजर्सनी पोस्टवर कमेंट करत व्हिडिओ बॅरँक्विलाचा असल्याचे सांगितले होते.
हे ही वाचा<< स्वातंत्र्य कसं दिसतं? पृथ्वीवरील सर्वात मोठा पक्षी जेव्हा भरारी घेतो.. IFS अधिकाऱ्याने दाखवला भारावून टाकणारा क्षण
निष्कर्ष: कोलंबियातील पाणी साचलेल्या रस्त्यावर एका माणूस लोकांना पुश कार्टमध्ये घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असुन दावा करण्यात येत आहे कि तो भारताचा आहे, पण हा व्हिडिओ कोलंबियाचा आहे. व्हायरल दावे खोटे आहेत.