Jugaad Video: सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कधी कुणी कारचं हेलिकॉप्टर बनवतो, तर कधी जुगाड वापरून कुणी विटेपासून कुलर बनवतो. आता असाच एक नवा जुगाड व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. वास्तविक, जुगाडचे नवीन व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. पण आता जो जुगाड व्हायरल झाला आहे त्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. खरंतर, एका व्यक्तीने पाणी गरम करण्यासाठी असा उपाय शोधला जो पाहून लोकं आश्चर्यचकित होत आहेत. त्या व्यक्तीने चुल तयार करण्यासाठी अशी शक्कल लढवली आहे की ज्यामुळे एकाचवेळी स्वयंपाकही बनवता येईल आणि पाणी देखील गरम होईल. बघूया काय आहे हा जुगाड…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही याला ‘टू इन वन चुल’ असेही म्हणू शकता जिथे एकाचवेळी स्वयंपाकही बनवता येतो आणि पाणी देखील गरम करते. या चुलीची खास गोष्ट म्हणजे त्यावर गिझरपेक्षा झटपट पाणी गरम करता येते. तुम्ही विचार करत असाल की, हे कसे शक्य आहे. कारण सामान्यत: चुलीवर एका वेळी एकच काम करता येते एकतर पाणी गरम करता येईल किंवा स्वयंपाक करता येईल. पण तीच तर गंम्मत आहे. एका वेळी दोन कामे करण्यासाठी एक व्यक्तीने जुगाड करून ही हटके चुल बनवली आहे. जर तुम्ही चुलीच्या एका बाजूच्या पाईपमध्ये थंड पाणी ओतले तर ते दुसऱ्या बाजूने गरम बाहेर येईल. अशाप्रकारे, जेव्हा तुम्ही स्वयंपाकासाठी चुल पेटवली की तुमची एकाच वेळी दोन कामे पूर्ण होतील. तुम्ही आरामात स्वयंपाक बनवून शकता आणि दुसरीकडे पाणी देखील गरम होत राहील.

हेही वाचा – Fact Check : ऑफिसच्या मीटिंगमध्ये हिंदी बोलण्यावरून कर्मचाऱ्यांच्या वादाचा व्हिडीओ SCRIPTED; जाणून घ्या त्याचे सत्य

लोकांना हा देशी जुगाड फार आवडला आहे. लोक व्यक्तीच्या हटके कल्पनेचे खूप कौतुक करत आहेत. कारण या चुलीवर पाणी गरम करण्यासाठी कोणतीही वेगळी सोय करण्याची गरज नाही. खेड्यापाड्यात अशा जुगाडांमुळे वेळेची बचत तर होतेच शिवाय लोकांचे कामही कोणत्याही खर्चाशिवाय सोपे होते. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ४ दिवसांपूर्वी vashistworld नावाच्या पेजने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे – स्वदेशी चुल. या व्हिडिओला आतापर्यंत १४ लाखांहून अधिक वेळा लोकांनी लाइक केले आहे. जुगाड करणाऱ्या व्यक्तीचे लोक व्हिडिओवर भरपूर कमेंट करून कौतुक करत आहेत. त्यामुळे काही लोक त्याचा आनंदही घेत आहेत.

हेही वाचा – काही मिनिटांच्या अतंराने जन्मली जुळी मुलं तरी दोघांमध्ये आहे एका वर्षाचे अंतर; चिमुकल्यांच्या जन्मावेळी घडला दुर्मिळ योगायोग!

एका व्यक्तीने लिहिले आहे – “जुगाड धोकादायक आहे.” दुसर्‍याने लिहिले – मला ही चूल कुठे मिळेल, मलाही हवा आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले, “एलियन्स तुमचे लोकेशन शोधत आहेत.” चौथ्या व्यक्तीने लिहिले – “हा जुगाड फक्त भारतातील लोकांचाच असावा”. पाचव्याने लिहिले- “अप्रतिम”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man made two in one chul from jugaad to heat water keep cooking and hot water will keep coming out watch viral video snk