सोशल मीडियावर सध्या रील्सचा पूर आलाय. कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेलात की, तुम्हाला सर्वांत आधी रील्स दिसतात. आपली क्रिएटीव्हीटी लोकांपर्यंत पोहोचावी आणि आपले फॉलोअर्स वाढावेत, असा या रील्स बनवणाऱ्यांचा हेतू असतो. रील्सना मिलियनमध्ये व्ह्यूज असतात. या व्ह्यूजसाठी काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न युजर्सचा असतो, त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बनवतात. रील्ससाठी काही जण तर अगदी जीवही धोक्यात घालतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रेल्वे रुळाखाली झोपून रील बनवताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रील बनवण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसत आहे. ही व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर झोपून आपले दोन्ही हात डोक्याखाली ठेवते. त्यानंतर त्याच्यावरुन ट्रेन तिथून भरधाव वेगाने जाते. हा व्यक्ती जीव मुठीत घेऊन व्हिडिओ बनवत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे, सेल्फी घेण्यासाठी धडपडणारा युवा वर्ग आता रील्स बनवण्यासाठी आणि तो सोशल मीडियावर शेअर करुन नेटीझन्सचं अटेंशन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. यापूर्वी रील बनवताना रेल्वेची धडक बसून अनेक तरुणांचा मृत्यू झालाय..असे असतानाही लोक रेल्वेच्या भोवती अशा रिले तयार करताना दिसतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – दिव्यांग व्यक्तीला अमानुष मारहाण; लोंखडी रॉडने आधी डोक फोडलं, मग गाडी..Video पाहून अंगावर येईल काटा
काही लोक लाइक्स आणि व्ह्यूजच्या शर्यतीत आपला जीव धोक्यात घालण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत.