कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर पटकन व्हायरल होते. मग ते एखाद गाणं असो किंवा एखादे कौशल्य, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओंमध्ये अचंबित करणारे कौशल्य दिसते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क बर्फावर वेगवेगळे डिझाईन काढत असल्याचे दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये बर्फावर वेगवेगळ्या, सुंदर, भव्य डिझाईन्स काढण्यात आल्याचे दिसत आहे. सुरुवातीला बर्फावर कोणीतरी चालत असल्याचा हा व्हिडीओ आहे असे आपल्याला वाटते, पण नंतर त्यावर डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट होते. हे अनोखे कौशल्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पाहा व्हायरल व्हिडीओ.
व्हायरल व्हिडीओ:
आणखी वाचा- Video: एअरपोर्टवर पहिल्यांदा गेलेल्या माणसाची ‘ही’ करामत होतेय Viral; सामानाच्या जागी स्वतः जाऊन…
या अनोख्या कौशल्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.