इंटरनेटवर विचित्र खाद्यपदार्थांचे व्हिडीओ नेहमीच दिसतात. सोशल मीडियावर अनेकदा अशा क्लिपवर नेटीझन्स आवर्जून प्रतिक्रिया देतात. कालपासून , सोशल मीडिया वापरकर्त्याने चीज, पनीर, चेरी, ड्रायफ्रूट्स आणि भाज्या हे टाकून एक माणूस डोसा बनवत असल्याचा व्हिडीओ सगळीकडे ट्रेंड करत होता. एका फुड व्लॉगरने बनवलेला हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. व्हिडीओमधील रेसिपी बघून नेटीझन्सने मात्र नाराजी व्यक्त केलेली दिसत आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

या विशिष्ट डिशला दिलखुश डोसा असे म्हटले जाते. कदाचित दिलखुश मिठाईवरून प्रेरणा घेत हा डोसा बनवला असावा असही म्हंटल जात आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर डोसा तयार करणाऱ्या माणसाचा व्हिडीओ प्रथम ऑगस्टमध्ये यूट्यूबर हॅरी उप्पलने पोस्ट केला होता. ५९ सेकंदांची ही क्लिप नंतर ५ सप्टेंबर रोजी वापरकर्ता दीपक प्रभू यांनी ट्विटरवर पोस्ट केली, त्यानंतर ती व्हायरल झाली.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की डोसा बनवण्यासाठी, माणसाने डोसा पिठला तव्यावर पसरवून सुरुवात केली. मग, त्याने त्यावर भरभरून बटर लावले.पुढे, त्याने चिरलेला कांदा, कोबी आणि शिमला मिर्ची, नारळाच्या चटणी असं सगळं टाकलं. यानंतर त्यावर किसलेले पनीर, आणि काजू, बदाम आणि मनुका सारखे ड्राय फ्रुट घातले. मग, त्या माणसाने मिश्रणात जीरा पावडर आणि गरम मसाला टाकला हे सर्व मॅश केले. मिश्रण चांगले शिजवल्यानंतर, त्याने डोसामध्ये रोल करण्यापूर्वी कोथिंबीर, किसलेले चीज आणि चेरी टाकली. नंतर, त्याने डोसाचे तुकडे केले आणि सर्व्ह करण्यापूर्वी किसलेले चीज आणि चेरीने सजवले.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओला ऑनलाइन हजारो व्ह्यूज मिळाले आहेत परंतु डोसाची ही खास रेसिपी पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते नाराज आहेत. दीपक प्रभूंच्या पोस्टवर नेटिझन्सनी दिलखुश डोसाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी टिप्पण्या टाकल्या. “चीजच्या या ध्यासाने अनेक खाद्यपदार्थ नष्ट केले आहेत,” एक वापरकर्ता म्हणाला. “हा डोसाचा अपमान आहे.” असही एकाने टिपण्णी केली.

तुम्हाला काय वाटत या व्हिडीओबदल?