Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराचे २२ जानेवारीला उदघाटन होणार आहे आणि याची तयारी सुद्धा जोरदारपणे सुरु आहे. तसेच सोशल मीडियावरही रामभक्त श्री राम मंदिरासाठी रांगोळी, पेंटिंग, खास पदार्थ, साडी, अगरबत्ती आदी गोष्टी त्यांच्यासाठी मनोभावे बनवताना दिसून आले आहेत. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात चक्क बिस्किटांपासून राम मंदिर तयार केलं आहे.

सोशल मीडियावरील युजर श्री घोष आणि त्यांच्या मित्रांनी मिळून हे भव्य राम मंदिर बनवले आहे. थर्माकोल, प्लायवूड, ग्ल्यू गन आणि पार्ले-जी बिस्किटे यांच्या सहाय्याने हे श्री राम मंदिर तयार केले आहे. तसेच हे मंदिर बनवण्यासाठी त्यांना चक्क पाच दिवसांचा कालावधी लागला आहे. मंदिरांची लांबी चार फूट बाय चार फूट असून यासाठी चक्क २० किलो पार्ले-जी बिस्किटांचा वापर करण्यात आला आहे. पार्ले-जी बिस्किटांपासून साकारलेल राम मंदिर एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.

Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
Naga Sadhus in Kumbh Mela
Maha Kumbh Mela 2025: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?
mhada bolinj loksatta news
वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
Raja Ranichi Ga jodi Fame Actress Kelvan
फिश फ्राय, सोलकढी, गोडाचे पदार्थ अन्…; ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्रीचं ‘असं’ पार पडलं केळवण, फोटोंनी वेधलं लक्ष
kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो

हेही वाचा…Indian Railway: ५ वर्षाखालील मुलांसाठी रेल्वे प्रवासात तिकीट काढावे लागते का? भारतीय रेल्वेने फोटो शेअर करीत दिले उत्तर

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, अगदीच बारकाईने या मंदिरांचा अभ्यास करून, मंदिराची वैशिष्ट्ये लक्षात ठेवून त्यांची रचना केली आहे.
बिस्किटांचा उपयोग या तरुण मंडळींनी अदभुत कला दाखवण्यासाठी केला आहे. तसेच हे मंदिर बनवण्यासाठी त्यांनी २० किलो पार्ले-जी बिस्किटांचा वापर केला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @durgapur_times या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक रामभक्त हा व्हिडीओ पाहून कमेंटमध्ये जय श्री राम म्हणताना दिसत आहेत. या व्हिडीओत तुम्हालाही तरुणांची उत्तम कामगिरी आणि बिस्किटांच्या रचनेतून साकारलेलं या भव्य मंदिराची एक झलक पाहता येईल ; जे पाहून तुम्ही थक्क व्हाल आणि या तरुणांचे कौतुक कराल..

Story img Loader