सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट अशा कलागुणांचे कौतुक केले जाते. मग ते कलागुण कोणतेही असूदे; गायन, नृत्य, चित्रकला, पाककला किंवा सायकल चालवत कॉफी बनवणे. सर्वांचे कौतुक केले जाते. एक मिनिट… हे पाककलेपर्यंत ठीक होतं, पण सायकल चालवत कॉफी बनवणे म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, हो ना…; अहो, पण सध्या सोशल मीडियावर कॉफी बनवण्याच्या या भन्नाट प्रकारचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवरील davooodism नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आता नेमके व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काय आहे ते पाहूया. व्हिडीओ आपण स्वतः समोरचे दृश्य पाहत आहोत अशा पद्धतीने म्हणजेच Pov [point of view] पद्धतीने शूट केला आहे. यात आपल्याला सायकल, हॅण्डल आणि समोरचा रस्ता दिसतो आहे. सायकलचे हॅण्डल न धरता, ती चालवत व्यक्ती कॉफीची तयारी करतो.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…

हेही वाचा : हॉटेलला लागलेली आग विझवण्यासाठी स्थानिकांचा भन्नाट जुगाड! Video पाहून नेटकरी म्हणाले, “अरे रे…”

त्यामध्ये तो सगळ्यात पहिले एक लाकडी फळी हॅण्डलवर ठेवतो. त्यावर एक रुमाल पसरतो. आता यावर कॉफीचे पातेले आणि छोटी शेगडी ठेवून देतो. सगळी तयारी झाल्यावर कॉफीच्या पातेल्यात कॉफी आणि थोडं पाणी घालतो. आता ती लहानशी शेगडी लायटरच्या मदतीने पेटवून कॉफी उकळून घेतो आणि एका कपात ओततो.

सर्वात शेवटी रस्त्याच्या कडेला उभी असलेली व्यक्ती त्या सायकलवर कॉफी बनवणाऱ्या व्यक्तीला हात करते. तेव्हा सायकल चालवणारी व्यक्ती त्याने तयार केलेली कॉफी लाकडी फळीसकट त्या माणसाला देतो, असे आपल्याला व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. खरंतर या पूर्ण व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने एकदाही सायकलच्या हॅण्डलला हात लावल्याचे आपल्याला दिसत नाही.

असा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर, काही वेळातच तुफान व्हायरल झाला. कॉफी बनवण्याच्या या पद्धतीवर नेटकरी काय म्हणतात ते पाहू.

हेही वाचा : हळदीच्या पुऱ्या, पालकाचे पाणी… पाहा ‘रेनबो पाणीपुरी’चा व्हायरल Video!; नेटकरी म्हणतात, “नको…”

“बापरे! सायकलवर केवढा ताबा आहे याचा! खूपच कमाल…” असे कौतुक एकाने केले आहे. “कोणतीही गोष्ट खाली नाही पडली, तो स्वतः कुठेही धडपडला नाही हे कसं शक्य आहे!” असा प्रश्न दुसऱ्याने विचारला आहे. “भारी!” असे तिसऱ्याने लिहिले आहे. “छे! इथे मला सायकल धड चालवता येत नाही..” असे चौथ्याने म्हटले आहे.

इन्स्टाग्रामवर @davooodism नावाच्या व्यक्तीने शेअर केलेला हा व्हिडीओ आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओवर ५.२ मिलियन इतके व्ह्यूज आलेले आहेत.

Story img Loader