ज्याच्यासोबत आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्न आपण पाहतो त्या प्रिय व्यक्तीची साथ सोडताना किती दु:ख होत असेल याची कल्पना आपण कधीच करु शकत नाही. आपल्या डोळ्यादेखत आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीला जग सोडून निघून जाताना पाहण्यासारखं दुर्भाग्य दुसरं कोणतंच नसेल. पण काही लोक यापलीकडे जाऊन आयुष्याचा विचार करतात आणि आपल्या कृतीतून लोकांचा ‘प्रेमा’कडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलतात. आपण किती छोट्या छोट्या गोष्टीमुळे ब्रेकअप करतो ना! ती किंवा तो ऐकत नाही, समजून घेत नाही अशा छोट्या छोट्या तक्रारी करून प्रेमाचे नाजूक पंख आपण सहज छाटून टाकतो. पण काही जण असे असतात की आपलं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत टिकवण्यासाठी धडपड करतात. तेव्हा प्रत्येकांनी एक क्षणभर थांबून का होईना राँडा आणि मँडा यांच्या प्रेमकथेची पानं चाळलीच पाहिजे.
VIDEO : मृत आईला बिलगून दूध पीत होता चिमुकला, दृश्य बघून पोलिसांनाही अश्रू अनावर
वाचा : राँग नंबरमुळे जुळल्या रेशीमगाठी!
राँडा कॅन्सरमुळे शेवटच्या घटका मोजते आहे. आपण फार काळ जगू शकत नाही हे तिला माहिती होतं. पण आपण ज्या व्यक्तीवर लहानपणापासून प्रेम केलं त्या व्यक्तीसोबत आयुष्याची दोर कायमची बांधली जावी, अशी तिची इच्छा होती. आपलं लग्न धुमधडाक्यात व्हावं, मैत्रमैत्रिणी नातेवाईंकानी आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावे एवढं स्वप्न तिने मँडासोबत पाहिलं होतं. पण दुर्दैवाने तिला कॅन्सर झाला. हा आजार संपूर्ण शरिरात पसरत गेला. आता तिच्याजवळ फक्त काहीच दिवस उरले. आपल्याशी लग्न करण्याची तिची शेवटची इच्छा आहे हे जेव्हा मँडाला समजले. तेव्हा तिच्या इच्छेखातर रुग्णालयातच त्याने तिच्याशी लग्न केले. तिच्या इच्छेप्रमाणे धुमधडाक्यात लग्न करणं काही शक्य नव्हतं पण देवाला साक्षी ठेवत त्याने शेवटच्या श्वासापर्यंत तिची साथ देण्याचं मान्य केलं.