Man masturbating in bus video: रेल्वे, मेट्रो, बस अशा सार्वजनिक ठिकाणीदेखील विकृत माणसांची हिंमत वाढत चालली आहे. कोणाचाही विचार न करता अनेक जण आपली मनमानी करतात आणि अशा ठिकाणी अश्लील कृत्य करतात. सध्या अशीच एक घटना एका बसमध्ये घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता आणि सामाजिक वर्तनाबद्दल चिंता निर्माण केली आहे. या घटनेत बसमध्ये प्रवाशांसमोर एका माणसाने अश्लील कृत्य केले आहे.

धावत्या बसमध्ये अश्लील कृत्य

बसमध्ये व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका धावत्या बसमध्ये एक माणूस अश्लील वर्तन करताना दिसतोय. सीटवर बसून रात्रीच्या अंधारात सगळ्यांसमोर हे अश्लील कृत्य तो करत आहे. त्याचं हे अश्लील कृत्य एका व्यक्तीने व्हिडीओमध्ये रेकॉर्ड केलं आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

यामुळे बसमध्येही महिला सुरक्षित नाहीत अशी चिंता नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ही घटना साताऱ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये घडली, असं व्हिडीओच्या कॅप्शनमधून कळून येतंय. दरम्यान, या माणसावर कोणतीही कारवाई झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @civicmirrorpune अकांउटवरून शेअर करण्यात आला असून “धावत्या बसमध्ये तरुणीसमोर लंपटाचे अश्लील चाळे, साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या बसमध्ये घडला प्रकार…” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओला तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

माणसाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “व्हिडीओ काढण्यापेक्षा चार कानाखाली का नाही मारल्या”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “काय लोकांची मानसिकता आहे तेच कळत नाही”, तर तिसऱ्याने “अशा लोकांना पब्लिकने मारलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा असं काही करताना अशी लोक १०० वेळा विचार करतील” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “आता एकट्या स्त्रियांनी प्रवास करावा की नाही हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.” तर एकाने, “याने तर लाजच सोडली…” अशी कमेंट केली.

Story img Loader