दिल्ली मेट्रो गेल्या दिवसांपासून वारंवार चर्चेत आहे. कधी येथे कोणीतरी येऊन डान्स करते, कोणी मारामारी करते, तरी कोणी एकमेकांचे चुंबन घेताना दिसतात. आता दिल्ली मेट्रो बिगॉबॉसच्या घरासारखी झाली आले जिथे सतत काही ना काही असे घडते ज्याची सर्वत्र चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये एका व्यक्तीने कौशल्य दाखविले आहे, ज्यामुळे सर्वजण त्याचे कौतुक करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंस्टाग्राम यूजर कृष्णांश शर्मा (Krishnansh Sharma) या अकांउटवर शेअर केलेले दोन व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. कृष्णांश यांनी पहिला व्हिडिओ २ मे पोस्ट केला आहे ज्याला लोकांचा उत्तम चित्रपट केला आहे. त्यानंतर दुसरा व्हिडिओ त्याने आठवड्यापूर्वी शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो मेट्रोमध्ये प्रवास करताना मेंट्रो अनाउंसरची नक्कल करताना दिसतात. तुम्हाला माहित असेल की दिल्ली आणि लखनऊ मेट्रोमध्ये दुरदर्शनच्या पूर्व प्रेंजेटर आणि व्हॉइस आर्टिस्ट शम्मी नारंग (Shammi Narang) यांचा आवाज आहे तसेच इंग्रजी भाषेतील महिलेच्या आवाजात पूर्व अँकर रिनी सायमन खन्ना यांचा आहे.

हेही वाचा – मोनिका, जोई, चँडलर, रॉस, फिबी, रेचल….’फ्रेंडस’मधील तुमच्या लाडक्या पात्रांचे बालपणीचं गोंडस रुप पाहिलं का? पाहा व्हायरल फोटो

मेट्रो ट्रेनच्या अनाउंसरची केली नक्कल

शम्मी नारंग यांच्या आवाजाचा जितका बेस जास्त आहे की त्यांची नक्कल करणे प्रत्येकासाठी सोप नाही. व्हिडिओमधील व्यक्ती त्यांची नक्कल केले आहे जी ऐकून दोघांच्या आवाजातील फरक ओळखणे अवघड होत आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये तो खूप गर्दीमध्ये मेट्रोत प्रवास करत आहे आणि तो म्हणतो, पुढील स्टेशन कश्मिरी गेट आहे, येथे रेड लाईनसाठी मार्ग बदला. तर दुसऱ्या व्हिडिओत तो आरामात मेट्रोमध्ये बसलेला दिसत आहे. या व्हिडिओत तो नेहमी ऐकू येणारा सावधनतेचा इशाऱ्याच्या आवाजाची नक्कल करत आहे. तो म्हणतो की, प्रवाशांनी आपल्या हलक्या वस्तू, जसे साडी, धोतर, ओढणी बॅग अशा वस्तूंची विशेष काळजी घ्यावी.”

व्हिडिओ होतोय व्हायरल

पहिला व्हिडिओ जवळपास २६ लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे जर दुसरा व्हिडिओ जवळपास ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. कित्येक लोकांनी कमेंट करून विशेष प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांचे कौतुक केले आहे.