Jugaad Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा कुणीही अंदाज लावू शकत नाही. कोणी कारला हेलिकॉप्टर बनवतं, तर कोणी देशी जुगाड करून विटांपासून कुलर बनवतं. आताही अशाच प्रकारचा एक देशी जुगाड केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून सर्वच थक्क झाले आहेत. एका व्यक्तीने जुगाड करुन असं काही केलं आहे, जे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, एकाने मारुती ८०० कारला चक्क ट्रकचे चाक बसवून एसयूव्ही कार बनवली आहे. हा भन्नाट व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक मॉडिफाय मारुती ८०० कार वेगाने जात आहे. पण तु्म्ही हा व्हिडीओ थोडा बारकाईने पाहिला तर तुम्हाला या कारला मोठे चाक बसवून एसयूव्हीमध्ये रुपांतर केलं आहे. असा जुगाड क्वचितच कुणी केला असेल, असं तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्की म्हणू शकता.

नक्की वाचा – आजच रक्तदान करा! कर्करोग-लठ्ठपणाचा धोका होणार कमी, रक्तदान केल्याने आरोग्याला होतात ‘हे’ ६ मोठे फायदे

इथे पाहा व्हिडीओ

या व्हिडीओला automobile.memes नावाच्या इन्स्टाग्राम युजरने पोस्ट केलं आहे. व्हिडीओ शेअर केल्यानंतर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ऑल्टोची कॅपेबिलिटीला कुणीही हरवू शकत नाही. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. या जबरदस्त व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “मारुतील ट्रकचे चाक लावले आहेत, असं दिसतंय.”

Story img Loader