रस्त्यावरून जात असताना, कधी ट्रेनमध्ये, तर कधी गर्दीच्या ठिकाणी तरुणींसोबत छेडछाड करणाऱ्या तरुणांना चांगलाच चोप मिळाला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार लिफ्टमध्ये घडला असून या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एक तरुणी लिफ्टमधून जात असताना शेजारी असलेला तरुण तिचा विनयभंग करतो. त्या तरुणाच्या गैरवर्तणुकीनंतर संतापलेली तरुणी त्याला चांगलाच चोप देते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लिफ्टमध्ये छेडछाड करणाऱ्याला एका तरुणीने कानशिलात लगावत त्याची धुलाई केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुणी लिफ्टच्या आत येताना व्हिडीओत दिसते. त्या लिफ्टमध्ये एक तरुणाने आधीच प्रवेश केलेला असतो. तो मुलगा त्या तरुणीकडे विचित्र नजरेनं पाहतो आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर संतापलेली तरुणी त्याला चांगलीच कुटते.

आणखी वाचा – Viral News: पती-पत्नी और वो! संसार थाटल्यानंतर नवरीला भेटायला गेला पहिला प्रियकर, त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

इथे पाहा व्हिडीओ

तरुणाची केली धुलाई

लिफ्टमध्ये छेडछाड करणाऱ्याला तरुणी आयुष्यभरासाठी अद्दल घडवते. त्याच्या कानाखाली दोन थपडा मारून त्याला कुटते. व्हायरल झालेल्या या व्हिडीओला LockerRoomLOL नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास २ लाख पेज व्यूज मिळाले आहेत आणि सहा हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. महिलांना छेडणाऱ्या तरुणाची अशीच धुलाई केली पाहिजे, असं एका युजरने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man molesting a woman in lift man beaten up by woman very badly video goes viral on social media nss