Viral video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. गोरखपूरच्या खजनी तहसीलमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका व्यक्तीने आपल्या लग्नाची मिरवणूक घोड्यावर नव्हे तर बुलडोझरवर काढली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, हौशेला मोल नाही.

हौसेला मोल नाही!

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

लग्न म्हटलं तर धांगडधिंगा हा आलाच. डीजे, बँड नसेल तर ते लग्न कसले. आजच्या काळातील लग्न डीजे आणि बँडशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. डीजेच्या तालावर वाकडेतिकडे कंबर करत नाचणारी तरुण-तरुणी लग्नाचा माहौल तयार करतात. या ठिकाणी मात्र ही अनोखी एंट्री पाहून सर्वांनाच कुतुहूल वाटलं. लग्नातील ही दमदार एंट्री पाहून केवळ लोकांनाच आश्चर्य वाटले नाही तर वधूलाही आश्चर्याचा धक्का बसला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना लोक बुलडोझर बाबा म्हणून ओळखतात. यूपीमधील योगी सरकार अनधिकृत कामांवर बुलडोझर चालवण्याबाबत देशभर प्रसिद्ध आहे आणि आता ही बुलडोझर संस्कृती हळूहळू देशात पसरत आहे. यावेळी नवरदेवानेही बुलडोझर सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत त्या बुलडोझरवर आपल्या लग्नाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. या अनोख्या स्टाईलमध्ये लग्नाची मिरवणूक आल्याचे पाहून दोन्हीकडची वऱ्हाडी अवाक् झाली. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती बुलडोझरवर नाचताना आणि गाताना दिसत आहे. बुलडोझरला फुले व माळांनी सुंदर सजावट करण्यात आली आहे. समोरून बुलडोझर फिरत आहे आणि बॅण्डवादक मागे फिरत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “पाऊस आणि बायको फक्त सुरुवातीलाच…” पुणेरी स्टाईल पाटी व्हायरल; वाचून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ @sanjayjourno नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे, ज्यावर नेटकरी मजेदार कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले… जय बुलडोझर बाबा, तुमच्या लग्नाबद्दल अभिनंदन. दुसऱ्या युजरने लिहिले, लोक दाखवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय करतात? तर आणखी एका युजरने लिहिले, लग्नसमारंभात बुलडोझरला प्रचंड मागणी असणार आहे. तर आणखी एका नेटकऱ्यानं यावर टीका करत “आजकालची तरुणाई इतकी बिनधास्त आहे की त्यांना कुणाचीही भीती राहिलेली नाही. आजच्या तरुणाईला कुणाच्याही बंधनात रहायचं नाहीये”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader