Tiger attack on Man Viral Video : सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे वेगवेगळे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाघाची डरकाळी ऐकून चांगल्या लोकांना घाम फुटतो. मात्र अशी कल्पना करा की तुम्ही कुठेतरी पायी जात आहात आणि अचानक तुम्हाला तुमच्या समोर वाघ दिसला, तुम्ही काय कराल? अशी परिस्थिती कोणावर ओढवली तर खेळ खल्लास हे नक्की. आता तुम्ही म्हणाल आम्ही अशा ठिकाणी जातच नाही, मात्र आता असा विचार का की तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करताय आणि समोर चक्क वाघ बसलाय…तुमची काय अवस्था होईल. अशीच वेळ एका व्यक्तीवर आली त्यानंतर काय घडलं हे तुम्हीच पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. यात सिंह आणि वाघांचा क्रमांक पहिला येतो. ते जगातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानले जातात, जे मानवांवर देखील हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना भूक लागली तर ते कोणालाही आपला बळी बनवू शकतात.

जरा कल्पना करा, एक दिवस तुम्ही तुमचा दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा आहे – तुमची काय अवस्था होईल? असाच काहीसा भयानक अनुभव या व्यक्तीसोबतही घडला. दरवाजाचं कुलूप उघडताच आणि बाहेर पाहताच त्याला धक्का बसला, कारण एक वाघ त्याच्यासमोर बसला होता! त्याने काही सेकंद वाघाकडे पाहिलं आणि नंतर हळूच दरवाजा बंद करायला सुरुवात केली, पण तितक्यात वाघ त्याच्यावर झेपवला. नशीब बलवत्तर म्हणून तो माणूस वेळीच दरवाजा बंद करू शकला, नाहीतर त्याच्या जीवावर बेतलं असतं.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे! या व्हिडिओला आतापर्यंत १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोकं त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, अशा परिस्थितीत व्हिडीओ काढणं जिवावर बेतलं असतं. तर आणखी एकानं म्हंटलंय, फक्त एक सेकंदानं तो बचावला.