Man Got Dog Food From Amazon : ऑनलाइन इ कॉमर्स संकेतस्थळावरून पाहिजे त्या वस्तूऐवजी भलतीच वस्तू मिळाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच एक प्रकार यूकेमध्ये घडला आहे. एका व्यक्तीने अमेझॉनवरून महागडा मॅकबूक प्रो लॅपटॉप ऑर्डर केला होता. मात्र, तो मिळण्याऐवजी त्याला श्वानाचे जेवण मिळाल्याचे समोर आले आहे.
याहूनुसार, ब्रिटेनच्या डर्बिशायर येथील एलन वुडने २९ नोव्हेंबर रोजी आपल्या मुलीसाठी अमेझॉनवर १ लाख २० हजार रुपयांचा मॅकबुक प्रो लॅपटॉप ऑर्डर केला होता. मात्र, त्यांना लॅपटॉप ऐवजी श्वानासाठीचे अन्न मिळाले.
(Flashback 2022 : ‘ही’ आहेत २०२२ मधील Top 5 Best Smartwatches, टाका एक नजर)
अमेझॉनच्या पॅकेजमध्ये पेडिग्री डॉग फूडचे दोन बॉक्स होते ज्यात मिक्स सिलेक्शन इन जेली फ्लेवरची २५ पाकिटे होती. जेव्हा घटनेविषयी अमेझॉनला तक्रार केली तेव्हा त्यांनी मदत केली नाही, असा आरोप वुड यांनी केला.
वूड म्हणाले की, प्रथम मला विश्वास होता की ही समस्या सोडवली जाऊ शकते. पंरुतु, अमेझॉन ग्राहक सेवेशी बोलल्यानंतर या प्रकरणी ते माझी मदत करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. लॅपटॉप परत करत नाही तोपर्यंत ही स्थिती कायम होती. मला लॅपटॉप कधीच मिळाला नाही. डॉगफूड गोडाऊनमध्ये परत केल्यानंतरही काही फरक पडले नाही.
(‘या’ 5 भन्नाट ट्रिक्स लक्षात ठेवा, Whatsapp वापरताना भरपूर कामी येतील)
अमेझॉनला अनेकवेळा कॉल केला. प्रकरणाला व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवले आणि अन्य विभागांकडे वर्ग करण्यात आले. तरीही काही झाले नाही. त्यांनी माझे म्हणणे ऐकण्यास नकार दिला, असा वुड यांचा आरोप आहे.
दोन दशकांपासून मी अमेझॉनचा ग्राहक असून यापूर्वी आपल्यासोबत अशी कुठलीही समस्या निर्माण झाली नाही. मात्र, आता जे झाले त्यानंतर आपण कधीच अमेझॉनवरून खरेदी करणार नाही, अशी भावाना वुड यांनी व्यक्त केली.