मागील काही दिवसांपासून ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे.लोक दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या ऑनलाईन आपल्या आवडत्या गोष्टी ऑर्डर करतात. काही वेळा वस्तू जशा साईटवर दिसल्या, तशाच येतात. तर कधी यात अनेकांची मोठी फसवणूकही होते. या फॅडमुळे लोकांना दुकानात जाऊन शॉपिंग करायचा कंटाळा यायला लागलाय. मात्र कधी कधी जशी वस्तू ऑनलाईन दिसते, तशी ऑर्डर डिलीव्हर होत नाही. मागवलं एक आणि आलं भलतंच, असे अनेक फोटो विविध साईट्सवरुन अनेक ग्राहकांनी शेअर केले आहेत.
अशातच एका व्यक्तीने अॅमेझॉनवरून ९० हजार रुपये किमतीची कॅमेरा लेन्स ऑर्डर केली, मात्र बॉक्स ओपन करुन पाहताच या व्यक्तीला चांगलाच धक्का बसला. तुम्हीही हे पाहून डोक्याला हात लावाल.
अरुण कुमार मेहेर असं या व्यक्तीचं नाव असून यांनी ५ जुलै रोजी अॅमेझॉनवरून ९० हजार रुपये किमतीची सिग्मा 24-70 f 2.8 लेन्सची ऑर्डर दिली. दुसऱ्या दिवशी त्यांची ऑर्डर आली. मात्र जेव्हा त्यांनी बॉक्स उघडले तेव्हा त्यांना धक्काच बसला. बॉक्स आधीच उघडला होता, असा आरोप त्यांनी केला आणि कॅमेरा लेन्सऐवजी त्यात राजगिऱ्याच्या बिया होत्या. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पाहा फोटो
हेही वाचा – एका सिंहीणीसाठी दोन सिंह आपआपसात भिडले, पण दोघांच्या भांडणात सिंहीण पसार…पाहा VIRAL VIDEO
@amazonIN आणि Appario Retail द्वारे मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला असून ट्विटमध्ये त्यांनी लवकरात लवकर कॅमेरा लेन्स देण्याची मागणी केली आहे. अॅमेझॉन कंपनीने त्यांच्या या ट्विटला रिप्लाय करत या चौकशी करत असल्याची माहिती दिली आहे. तर अरुण कुमार मेहेर यांनी हे प्रकरण लवकरात लवकर सोडवा आणि मी ऑर्डर केलेली लेन्स मला पाठवा किंवा माझे पैसे परत करा अशी मागणी केली आहे.