अगदी अभ्यास करण्यापासून मोबाइल चार्ज करण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी वीज ही महत्त्वाची असते. दैनंदिन गोष्टी करताना काही मिनिटांसाठी जरी लाईट गेली की, विजेचं महत्व आपल्याला जाणवू लागतं. सध्या वर्क फ्रॉम होममुळे वायफाय तर एसी, फ्रीज, गिझर आदी अनेक गोष्टींच्या वापरामुळे वीज बिलात भरभक्कम वाढ होते. त्यामुळे आपल्यातील अनेक जण घराच्या वाढत्या वीज बिलामुळे हैराण असतात. वीज बिल एक हजार, दीड हजार रुपयांपेक्षा जास्त आलं तरी एक चिंतेचा विषय ठरून जातो आणि आपण इतका इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर करतो का असं मनात लगेच येऊन जातं… तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीचे दोन महिन्यांचे वीज बिल ४५ हजार रुपये आलं आहे.
ही घटना गुरुग्राममधील आहे. गुरुग्रामस्थित सीईओ जसवीर सिंग यांनी त्यांच्या दोन महिन्यांच्या वीज बिलाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जसवीर सिंग यांच्या घराचे एक-दोन हजार नव्हे तर चक्क ४५ हजार रुपयांचं बिल आलं आहे. या दोन महिन्याच्या बिलाची रक्कम पाहून त्यांनी स्वतः या गोष्टीचा एक स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर शेअर करण्याचे ठरवले आणि विजेची बचत करण्यासाठी मजेशीर उपाय स्वतःलाच सुचवताना दिसले. नक्की काय आहे हा उपाय, व्हायरल पोस्टमधून तुम्हीसुद्धा बघा…
हेही वाचा…रील्ससाठी जीवाशी खेळ! ट्रॅक्टरच्या चाकात जाऊन बसला ‘तो’ अन्…; धोकादायक स्टंटचा हा VIDEO व्हायरल
पोस्ट नक्की बघा…
व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, जसवीर सिंग यांनी त्यांच्या दोन महिन्यांचे वीज बिल २४ मे रोजी पेटीएमद्वारे भरलं आहे. तसेच या वीज बिलावर तुम्ही ४५,४९१ रुपये रक्कम पाहू शकता. त्यांनी ही पोस्ट शेअर करत लिहिले की, “वीज बिल भरले आहे. किंमत पाहता आता मेणबत्त्यांचा वापर करण्याची गरज आहे”; अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे, जी सध्या अनेकांना विचार करायला आणि हसायलाही भाग पाडते आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @jasveer10 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून युजर्स विविध गोष्टींवर चर्चा करताना दिसत आहेत. अनेक युजर्सनी वीज खर्चाबाबत स्वतःचे अनुभव शेअर केले, तर काही जणांनी जसवीर सिंग यांच्या वीज बिलामागील संभाव्य कारणांचा अंदाज लावला. तसेच कमेंट सेक्शनमध्ये विविध क्षेत्रांमधील विजेच्या विविध खर्चांवर आणि अनेकांना त्यांच्या उपयोगिता खर्चाचे व्यवस्थापन करताना येणाऱ्या आव्हानांवरही प्रकाश टाकला आहे.