तुम्ही कधी अस्वलाला आपल्या एखाद्या जवळच्या मित्रासारखं हाय फाईव्ह देताना पाहिलंय का? असे असे दुर्मिळ दृश्य जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा निश्चितपणे तो क्षण कॅप्चर केला पाहिजे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये अस्वल एका माणसाला चक्क हाय फाईव्ह देताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हिडीओ लोकांना किती आवडलाय हे त्याच्या व्ह्यूजवरूनच लक्षात येतं. या व्हिडीओला आतापर्यंत १७ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अस्वलांचा एक ग्रूप रस्ता ओलांडत दिसत आहेत. रस्ता ओलांडणारे अस्वल पाहून सर्वांनी आपआपल्या गाड्या त्यांच्या सुरक्षित मार्गासाठी थांबलेल्या दिसत आहेत. हे दृश्य पाहून अनेकांनी ताबडतोब आपआपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरूवात केली. अचानक एक गोंधळलेला अस्वल एका माणसाजवळ आला आणि त्याला हाय फाईव्ह देऊ लागला. हाय फाईव्ह दिल्यानंतरही हा गोंडस अस्वल बराच वेळ तिथे उभा होता. त्यानंतर तो पुन्हा आपल्या सहकाऱ्यांसोबत निघून गेला.
आणखी वाचा : एक-दोन नव्हे तर तब्बल ४० भुकेल्या मगरींनी सिंहिणीला घेरलं, मेलेल्या पाणघोड्याच्या मदतीने केली सुटका!
हा व्हिडीओ pubity नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झाला की आता हा व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या १७ मिलियनच्या पुढे गेली आहे. ४ लाख २ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओचा आनंद घेताना दिसून येत आहेत. या गोंडस अस्वलाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : अविश्वसनीय! शिकार समोर असून खतरनाक वाघांनी केला नाही हल्ला; VIRAL VIDEO पाहून कारण सांगू शकाल का?
काही लोकांनी हे अस्वल त्या माणसाकडे का गेले असावे याचे कारण सांगण्याचा प्रयत्न केला. “त्यांना खायला हवं आहे म्हणूनच आणि त्यांना माहित आहे की माणसं त्यांना खायला देतात”, असं एकाने कमेंटमध्ये लिहिलं. तर काही लोकांनी या गोंडस अस्वलासाठी हार्ट इमोजी शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलंय.