आजकाल सर्वचजण ऑनलाइन पेमेंट करताना दिसतात. अगदी दुकानातील ५ रुपयांच्या वस्तूंपासून ते हजार रुपयांपर्यंत सर्वजण पैसे देण्यासाठी विविध ऑनलाइन पेमेंट अॅप वापरतात. यामुळे भारतात प्रत्येकाकडे हल्ली Android फोन आहे. यामुळे भारतात डिजिटल पेमेंटचा ट्रेंडही सर्वाधिक पाहायला मिळतो. अशात ऑनलाइन पेमेंटशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती कीपॅडवाल्या साध्या मोबाईलने ऑनलाइन पेमेंट करताना दिसत आहे. पण त्याने हे कसे काय केले हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील संपूर्ण व्हिडीओ पाहावा लागेल.
व्यक्तीने कीपॅडवाल्या मोबाईलवरुन केले पेमेंट
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण नोकिया कंपनीचा जुना कीपॅडवाल्या मोबाईलने क्यूआर कोड स्कॅन करतोय आणि त्यानंतर तो पिन टाकून पेमेंट देखील करतो. व्हिडिओमध्ये पेमेंटचा मेसेजही दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी खरचं हे शक्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर अनेकांना व्हिडीओ खरा की खोटा असा प्रश्न लोकांना पडत आहे. पण कीपॅडवाल्या फोनवरूनही डिजिटल पेमेंट करता येते. पण अशी सुविधा फार कमी कीपॅडवाल्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे.
@Adityaaa_Sharma नावाच्या युजरने हा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. जो आत्तापर्यंत लाखो लोकांना पाहिला. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट करत अजून किती विकासाची पाहिजे, असे लिहिले आहे.