सोन्याची छोटीशी देखील खरेदी करायची असेल तर सगळ्यात पहिला आपण सोन्याचे दर पाहतो किंवा एखाद्या सणानिमित्त आकर्षक डिस्काउंट किंवा ऑफर असेल तरचं आपण सहसा सोने खरेदी करायला जातो. कारण – सोन्याचे भाव गगनाला भिडले तर प्रत्येकाचं सेव्हिंगचं गणित बिघडते . तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित काहीतरी मजेशीर पाहायला मिळालं आहे. एका व्यक्तीने फक्त १,१६७ रुपयात १८ कॅरेट सोनं खरेदी केलं आहे ; जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
मेक्सिकन रहिवासी याला सोन्याच्या खरेदीवर ९९ टक्के सूट मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही. रोजेलिओ विलारियल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीने सुमारे एक हजार रुपयांना महागड्या कार्टियर कानातल्यांची जोड (Cartier earrings ) खरेदी केली आहे. तुमचाही हे वाचून विश्वास बसत नसेल ना ? अत्यंत महागड्या ब्रँडसोबत एवढा परवडणारा करार करणे अशक्य होत. पण, कंपनीच्या वेबसाइटवरील एका चुकीमुळे हे शक्य झालं आहे.
हेही वाचा…उष्णतेमुळे तहानलेला उंट रस्त्यावर पडला; ट्रक चालक देवदूत बनून आला अन्… पाहा VIDEO
पोस्ट नक्की बघा…
कंपनीच्या वेबसाइची नेमकी काय चूक झाली आणि मेक्सिकन रहिवाशाला फक्त १,१६७ रुपयांमध्ये (USD 14) १८-कॅरोट रोज गोल्ड दागिने कसे खरेदी केले. हे सांगण्यापूर्वी, तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की, पॉश ब्रँड कार्टियरचे दागिने , मेघन मार्कल या सदस्यासह अनेक सेलिब्रिटींनी परिधान केले होते. ब्रिटिश राजघराण्यातील आणि माजी अभिनेत्री तसेच राणी कॅमिला अनेक वेळा आकर्षक कार्टियर नेकलेससह दिसली आहे.
तर अधिकृत वेबसाइटनुसार, त्यांच्या उत्पादनाच्या सर्वात कमी किमतीत असणाऱ्या कानातल्यांची जोड जवळजवळ ५० हजारांपर्यंत आहे आणि हळूहळू दर वाढतो आणि २.५ लाख USD (अंदाजे दोन कोटी रुपये) च्या पुढे जाऊन पोहचतो.तर रोजेलिओला ११,६७,७३० रुपये (USD 14,000) किमतीच्या कार्टियर कानातल्यांची एक जोड केवळ १,१६७ (USD 14) रुपयांमध्ये खरेदी करता आली. या व्यक्तीने ही आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आणि त्याने आकर्षक सोन्याचे कानातले घातलेला मिरर सेल्फी सुद्धा शेअर केला.
कंपनी कार्टियरने Pesosची डॉलर्समध्ये रूपांतर करताना चुकीची गणना केली आणि महागड्या कानातले २,३७,००० मेक्सिकन Pesos ऐवजी २३७ म्हणून सूचीबद्ध केले आणि हा गोंधळ झाला. त्याच क्षणी व्यक्तीने हे सोनं खरेदी केले आणि महागड्या कानातल्यांचा मालक झाला. सोशल मीडियावर ही पोस्ट @vlljssr या युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.