Man Peed On Women Air India Flight: विमानाच्या बिझनेस क्लासविषयी अनेकांना आकर्षण असतं. त्या पडद्याच्या मागे अशी कोणती सुख सोयीची दुनिया असते हे बघण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. पण अलीकडेच एअर इंडियाच्या विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये इतकी लज्जास्पद बाब घडली की जी कदाचित गच्च भरलेल्या ट्रेनमध्येही होत नसेल. एअर इंडियाने ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार एका मद्यधुंद पुरुष प्रवाशाने चक्क एका महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याचे समजत आहे. त्याहून चिंताजनक म्हणजे याबाबत महिलेने केबिन क्रूला माहिती दिली मात्र त्यांनीही तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचे समजत आहे. संबंधित पुरुष हा मात्र दिल्लीला विमान लँड होताच थेट विमानतळाच्या बाहेर निर्लज्जपणे निघून गेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राप्त माहितीनुसार महिलेने टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांना पत्र लिहून या घटनेची माहिती दिल्यावर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. महिलेने पत्रात लिहिल्यानुसार, केबिन क्रूला माहिती देऊनही बराच वेळ त्यांनी दुर्लक्ष केले. माझ्या सोयीचीच काय तर सुरक्षेचीही काळजी विमानात घेण्यात आली नव्हती. जेवण सर्व्ह केल्यावर विमानत मंद प्रकाश होता, संबंधित प्रवासी हा मद्यधुंद होता. तो अचानक त्याच्या सीटवरून उठून आला आणि माझ्या सीटसमोर येऊन त्याने आपली पँट खोलली, लघवी करून झाल्यावरही तो त्याचे प्रायव्हेट पार्ट्स दाखवत तिथेच उभा होता. माझे कपडे, बॅग सगळं काही लघवीने भिजलं होतं. अशावेळी केबिन क्रूला माहिती देताच त्यांनी केवळ निर्जंतुकीकरणाचा स्प्रे मारून पुढे काहीच कारवाई केली नाही.

हे ही वाचा<< Video: ‘ती’ थरथरत होती पण ‘तो’ इतका गर्विष्ठ की..विमानात प्रवासी व हवाई सुंदरीमध्ये खडाजंगी; म्हणाला, “तू नोकर..”

महिलेने सांगितले की माझ्या सीटलाही लघवीचा दुर्गंध येत होता. मी वॉशरूममध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ केलं तेव्हा क्रू ने मला पजामा व स्लीपर दिल्या, वॉशरूमच्या बाजूच्या छोट्या जागेत एका सीटवर मला बसायला दिलं. विमान लँड होईपर्यंत त्यांनी काहीच कारवाई केली नाही, उलट मलाच आम्ही तुम्हाला व्हीलचेअर देतो जेणेकरून मी कस्टममध्ये रखडणार नाही असा सल्ला दिला. ही मदत सुद्धा शाब्दिकच होती कारण विमानातून बाहेर पडल्यावर माझे सामान उचलण्यापासून सगळं काही मलाच करावं लागलं.

दरम्यान या सगळ्यावर आता एअर इंडियाने तपासासाठी एक समिती स्थापन केली आहे. संबंधित प्रवाशाचे नो- फ्लाय लिस्टमध्ये नाव टाकण्यात आले आहे. केबिन क्रूने आपल्या मर्यादेनुसार काम केले. त्यांनी त्या प्रवाशाला विलग करून दुसरीकडे बसायला दिले व विमानतळावर पोहोचताच सुरक्षा रक्षकांच्या हाती सोपवले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man peed on women air india flight business class cabin crew ignores women writes letter shocking story goes viral svs