ड्रायव्हिंग करायला कुणाला आवडत नाही. पण हल्ली रस्त्यावरील ट्रॅफिकची वाढती समस्या पाहता वर्दळीतून गाडी चालवण्याचं खरं कौशल्य आहे. रस्त्यावरल पुढ्यात एक जरी गाडी थांबली की संपूर्ण रस्ता ब्लॉक होऊन जातो. अशातून गाडी ज्याला चालवता आली तो खरा ड्रायव्हर…नाही का? अशाच एका परफेक्ट ड्रायव्हिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल, मला सुद्धा अशी ड्रायव्हिंग करायचीय. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
आतापर्यंत तुम्ही ड्रायव्हिंगचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. काही व्हिडीओ हे ड्रायव्हिंग करतानाच्या स्टंटचे असतात तर काही व्हिडीओ नदीखोऱ्यातून केलेल्या ड्रायव्हिंगचे असतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो कोणत्याही स्टंटचा नव्हे तर ट्रफिकमधून सुद्धा केलेल्या सुरक्षित ड्रायव्हिंगचा आहे. भर ट्रॅफिकमधून एका ड्रायव्हरने अशा पद्धतीने गाडी चालवली आहे, जे पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा ड्रायव्हिंग व्हिडीओ पाहून सुरूवातीला तुम्ही म्हणाल इतक्या ट्रॅफिकमधून आडमार्गातून गाडी चालवणं शक्यच नाही. पण हे प्रत्यक्षात करून दाखवलंय. आम्ही जे तुम्हाला सांगतोय त्यावर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
आणखी वाचा : हे काय? रॅम्पवॉक करताना मॉडेल अचानक प्रेक्षकाला मारू लागली, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल!
या ड्रायव्हरला सर्वांनी हेवी ड्रायव्हर म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये ड्रायव्हरने एका इमर्जेन्सीमध्ये साईटवर पोहोचण्यासाठी स्ट्रगल करत केलेली ड्रायव्हिंग आहे. भर ट्रॅफिकमधून गाडी बाहेर कशी काढता येईल हे या व्हिडीओमधल्या ड्रायव्हरला खूप चांगलं माहित होतं. ड्रायव्हरचं हे टॅलेंट पाहून लोक त्याच्या प्रेमात पडू लागले आहेत. प्रत्येकजण या ड्रायव्हरच्या परफेक्ट ड्रायव्हिंगचं कौतुक करताना दिसून येत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : महागाईच्या काळात फक्त ५ रुपयांत इडली डोसा; ‘अम्मा’चं सोशल मीडियावर होतंय कौतूक
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओच्या सुरुवातीला पॅरामेडिक भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याचं दिसून येत आहे. जॉयस्टिकप्रमाणे स्टेअरिंग फिरवत तो मुख्य रस्त्यावर पोहोचतो. यानंतर, वेगात जाणाऱ्या लहान-मोठ्या वाहनांना कट करत चालक पुढे जातच राहतो. मध्येच तो ट्रॅफिकला इमर्जन्सी सायरनही देतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही ड्रायव्हरचे फॅन व्हाल.
आणखी वाचा : टांझानियातील ‘त्या तरूणाची गोविंदा स्टाईलमध्ये डायलॉगबाजी, पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : नेत्रहीन व्यक्तीची ‘डोळस’ कामगिरी! पाहू शकत नसला तरी स्केटिंग करत दाखवला पराक्रम
हा व्हिडीओ pubity नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की, आतापर्यंत या व्हिडीओला १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांनी या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, “अशी ड्रायव्हिंग पाहून काही वेळासाठी असं वाटतंय की जणू गेमच चालु आहे.” दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलंय, “आतापर्यंत मी पाहिलेली सर्वात परफेक्ट ड्रायव्हिंग आहे”