Rickshaw Stunt Video : आजकाल लोक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी व्हिडीओ बनवण्याची संधीच शोधत असतात. या व्हिडीओसाठी ते कधी भररस्त्यात नाचतात, कधी गाड्यांबरोबर स्टंटबाजी करतात, तर कधी काय करतात याचा काही नेम नाही. अनेकदा लाइक्स आणि व्ह्यूजच्या नादात स्वत:सह ते लोकांच्या जीवाशी खेळतात. सध्या अशाच एका जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक ई-रिक्षाचालक भररस्त्यात खतरनाक स्टंटबाजी करतोय, पण यावेळी अचानक त्याची धावती रिक्षा उलटते अन् नंतर जे काही घडतं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

रस्त्यावरून वाहनं सावकाश चालवा, अशा सूचना अनेकदा दिल्या जातात. पण, त्यानंतरही काही चालक रॅश ड्रायव्हिंग करताना दिसतात. अशाने अपघाताच्या घटना घडतात आणि स्वत:बरोबर ते इतरांचा जीवही धोक्यात घालतात. व्हायरल व्हिडीओतही काही जण ई-रिक्षात बसून आनंदाने नाचताना दिसत आहेत. यावेळी चालक रिक्षाला वेडीवाकडी कशीही वळवत रस्त्याने पळवतोय. कधी तो एका चाकावर रिक्षाचा बॅलेन्स करतोय. यावेळी कोणीतरी मागून ही घटना रेकॉर्ड करत होता, पण अचानक रिक्षा उलटते आणि असे काही घडते की ते पाहून व्हिडीओ रेकॉर्ड करणाराही शॉक होतो.

रिक्षा उलटी होताच चालकाने मारली उडी अन्….

j

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरुणांचा ग्रुप आनंदाने ई-रिक्षावर बसून रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यावेळी रिक्षामधील काही तरुण आनंदाने नाचतायत. यावेळी रिक्षाचालक आडवीतिडवी कशीही रिक्षा वळवत रस्त्याने पळवतोय. अशाने रिक्षाचा बॅलेन्स बिघडतो आणि ती अचानक खाली कोसळणार इतक्यात चालक आधी रिक्षातून खाली उडी मारतो. पण, यानंतर धक्कादायक गोष्ट घडते ती म्हणजे, धावती रिक्षा अचानक पडल्यानंतर चालक पहिला बाहेर पडतो आणि नाचू लागतो यानंतर इतर दोन तरुणही बाहेर पडतात आणि आधी रिक्षा सरळ करतात. यावेळी चालक मात्र वेड्यासारखा नाचतच असतो. हे आता जरी हास्यास्पद वाटत असले तरी ते रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांसाठी मात्र धोक्याचे ठरू शकले असते. कारण अशाप्रकारे रस्त्यावर खेळ करणे अनेकदा इतरांच्या जीवावर बेतते.

स्टंटबाजीचा हा धक्कादायक व्हिडीओ @veejuparmar नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर आतापर्यंत अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘ई-रिक्षाबरोबर अशाप्रकारे स्टंटबाजी कोण करतं भाऊ?’, दुसऱ्याने लिहिले की, ‘अशा लोकांबरोबर असेच झाले पाहिजे, पण अपघात होऊनही तो का नाचतोय याचे मला आश्चर्य वाटते.’ तिसऱ्या एकाने लिहिले की, ‘हे खूप धोकादायक आणि बेजबाबदार लोक आहेत.’

Story img Loader