Man Risky Stunts Viral Video : डिसेंबर महिन्यात गुलाबी थंडीची चाहुल लागताच काही ठिकाणी जत्रेचा उत्सव सुरु होतो. ग्रामिण भागापासून शहरी परिसरात जत्रेच्या उत्सवाला उदंड प्रतिसाद मिळतो. हजारो लोक जत्रेला जातात आणि दुसऱ्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्नही करतात. जत्रेत एखाद्याने प्रवेश केला की, नको असलेला भोंग्यांचा आवाजही त्याच्या कानांवर पडतो. भोंगा वाजवून लोकांचं मनोरंजन करण्यातही काही जणांना रस असतो. पण काही माणसं जत्रेत गेली की त्यांना वाटतं आपण एखाद्या फिल्मी दुनियेतच आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारण जत्रेत असलेल्या पाळण्यात बसण्याचं सोडून त्यांना धोकादायक स्टंटबाजी करण्याची विनाशकाले विपरीत बुद्धी सुचते. असाच एक धक्कादायक प्रकार व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. एका तरुणाने जीवाची पर्वा न करता आकाश पाळण्याला लटकण्याचा जीवघेणा स्टंट केला. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – Video : त्या हायवेवर आहे महाकाय अजगराचा ‘दरारा’! वाहनांची गती काही सेकंदातच मंदावते, कारण…

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक तरुण पाळण्याच्या खूप जवळ उभा राहिलेला दिसत आहे. त्यानंतर पाळणा सुरु झाल्यावर स्टंटबाजी करण्याचा मोह त्याला आवरत नाही. पाळण्याच्या एका छोट्या भागाला लटकून तो तरुणी उंच भरारी घेताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ही थरारक दृष्य पाहून नेटकऱ्यांनाही मोठ धक्का बसला आहे. कारण लाखमोलाच्या जीवाला कवडीमोल करताना हा तरुण या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

इथे पाहा व्हिडीओ

त्या तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलेलं असावं, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दिल्या आहेत. नरेंद्र सिंग नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. ट्विटरवर व्हिडीओ शेअर केल्यानंतर युजरने तरुणांना कॅप्शनद्वारे आवाहन केलं आहे. “जत्रेत असे कारनामे अजिबात करु नका. तुम्ही खतरनाक खिलाडी कमी पण मानसिक रुग्ण जास्त वाटाल.”, असं ट्विटर युजरने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man performing risky stunts on a swing what happens next watch in the shocking viral video nss
Show comments