Viral Video :- सध्याच्या काळात सोशल मीडियाची खूपच क्रेझ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. त्यातच व्हायरल होण्यासाठी अनेक जण जीवावर बेतणारे स्टंट करतानाही दिसून येतात. त्यातल्या अनेकांचे स्टंट सफल होतात; तर काहींचे स्टंट फसतात. पाऊस पडला की, अनेक जण फुटबॉल खेळण्यासाठी मैदानात उतरतात. पण, तुम्ही कधी दोरीवर फुटबॉल खेळणारी व्यक्ती पाहिली आहे का? तर आज व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असेच काहीसे पाहायला मिळाले; ज्यात एक तरुण दोरीवर चालत फुटबॉल खेळताना दिसला आहे.
आतापर्यंत तुम्ही अनेक ट्रेंकिंगचे व्हिडीओ पाहिले असतील; ज्यात उंचावरून विशिष्ट साधनांची मदत घेऊन अनेक प्रकारचे स्टंट करण्यात येतात. तर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्हाला तरुण एक वेगळाच स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ एखाद्या निसर्गरम्य डोंगराळ भागातील आहे. जिथे ट्रेकिंगसाठी रुंद ब्रिजला अनेक दोऱ्या लावलेल्या तुम्हाला दिसतील. तर उंच टेकड्यांच्या अगदी मधोमध एक तरुण अनवाणी पायाने दोरीवर चालतना तुम्हाला दिसेल. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एवढ्या उंचावर जाऊन हा तरुण दोरीवर अनवाणी पायाने चालता चालता, एक पाय हवेत ठेवून फुटबॉलसुद्धा खेळताना दिसत आहे; जे पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल. व्हिडीओतील तरुण केशरी रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची शॉर्ट्स, काळया रंगाची टोपी घालून हा स्टंट अगदी बिनधास्त करताना दिसत आहे. तसेच यादरम्यान तरुणाच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे हेसुद्धा व्हिडीओतून दिसून येत आहे.
हेही वाचा :- नदीतून जाणाऱ्या बोटीला मगरींच्या कळपाने घेरलं, क्षणातच अंस काही घडलं…VIDEO पाहून अंगावर काटा येईल
व्हिडीओ नक्की बघा :-
सोशल मीडियावर असे अनेक जण आपण पाहिले असतील; जे बिनधास्तपणे असे कोणतेही स्टंट करण्यासाठी नेहमीच तयार असतात. काही जण उंच डोंगराळ भागातून उडी मारतात. उंच उंच गड-किल्यांवर चढतात. दोरीवर चालताना दिसतात. पण, उंच डोंगराळ भागात दोरीवर फुटबॉल खेळणाऱ्या या तरुणाला बघून कोणालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ (Slacktivity) यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि काही वेळातच तो व्हायरल झाला आहे. अनेक जण हा व्हिडीओ बघून हैराण झाले आहेत; तर काही जण हा स्टंट पाहून भीती व्यक्त करताना दिसत आहेत. काही जण म्हणत आहेत की असं तर फुटबॉल खेळाडू मेस्सीही नाही करू शकणार. अशा विविध कमेंटस् व्हिडीओखाली तुम्हाला पाहायला मिळतील.