Snakes Drinking Water video: कधी कधी सोशल मीडियात असे व्हिडीओज व्हायरल होता जे बघून आश्चर्याचा धक्का तर बसतोच सोबतच असे व्हिडीओ आपण पुन्हा पुन्हा बघतो. असाच एका सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात चक्क एक व्यक्ती सापाला स्वतःच्या तोंडात टाकतो आणि नंतर त्याला दातानं पडकून ठेवतो. याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियात तुम्ही आतापर्यंत सापांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण असा नक्की पाहिला नसेल. हीच या व्हिडीओची खासियत आहे.
नाग पाहिल्यानंतर चांगल्यांना घाम फुटतो, काहीवेळेला तुम्ही नागाच्या परिसरात गेल्यानंतर, तो तुम्हाला पाहून फणा काढतो किंवा तिथून बिळात निघून जातो. परंतु सध्या एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहून अनेकांना घाम फुटला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वृद्ध व्यक्ती अक्षरश: नागाला स्वत:च्या गळ्याभोवती गुंडाळून उभा आहे. एवढचं नाहीतर तो सापाचं तोंड पकडून चक्क स्वत:च्या तोंडात टाकतो. त्यानंतर नागाला दातानं पकडून ठेवतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> समोसा खाणाऱ्यांनो सावधान! समोसा बनवण्याचे पीठ चक्क पायाने तुडवले; किळसवाणा VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ infohse.id नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून काही लोक या व्हिडीओवर टीका करत आहेत तर काही लोक कारवाईची मागणी करत आहेत. तर काही लोक या सापाबाबतची माहिती विचारत आहेत. हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तर अनेकजण सापाबाबत चर्चाही करत आहेत.याआधीही काही सापांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते ज्यात एक व्यक्ती कोब्रा सापाला बॉटलने पाणी पाजताना दिसत आहे. हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झालाय. तर दुसऱ्या एका व्हिडीओत एक व्यक्ती उन्हाने वैतागलेल्या कोब्रा सापाची आंघोळ घालताना दिसत आहे.
ग्रामीण भागात जे नागरिक राहतात, ज्यांची घर शेतात आहे. किंवा ज्यांच्या घराच्या बाजूला शेती आहे, अशा ठिकाणी असे सर्रास प्रकार पाहायला मिळतात.