सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या झपाट्यानं व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल, एव्हढं मात्र नक्की. तुम्ही आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण व्हिडीओ जरा स्पेशल आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत. आम्हाला खात्री आहे की, ज्यांना कुत्रे खूप आवडतात त्यांना हा व्हिडीओ खरोखर आवडेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस समुद्रकिनारी कुत्र्याच्या या गोंडस पिल्लासोबत मनसोक्त खेळताना दिसून येत आहे.
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ Buitengebieden नावाच्या Twitter अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ इतका मोहक आहे की तुम्ही हा व्हिडीओ संपल्यानंतर पुन्हा पुन्हा पाहणं पसंत कराल. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती समुद्रकिनाऱ्यावर धावताना दिसून येत आहे. या व्यक्तीच्या पाठोपाठ कुत्र्यांचा हा गोंडस पिल्लू देखील त्याच्या मागेमागे दुडूदुडू धावत आहे. कधी या व्यक्तीच्या भवती गोल गोल फिरत तर कधी आपल्या इवल्या इवल्याश्या पावलाने मागे मागे धावत माणसासोबत खेळताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ जसजसा पुढे जात आहे, तो माणूस खेळकरपणे धावतो आणि तसंतसं लहान पाय जितक्या वेगाने धावू शकतील तितक्या वेगाने कुत्र्याचं गोंडस पिल्लू मागे येतो. या लहान पिल्लाची धावण्याची क्षमता तुम्हाला बर्याच वेळा वाह म्हणायला लावेल.
आणखी वाचा : VIRAL : मुलांना गाडीत ठेवून पिकनिक एन्जॉय करत होते, अन् डोळ्या देखत स्कॉर्पिओ जळून खाक झाली
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : विना तिकीट प्रवास करणाऱ्याला पोलीस कर्मचाऱ्याने चालत्या ट्रेनमध्ये लाथ मारली, क्रूरतेचा VIDEO VIRAL
“एक छोटीशी गोष्ट सुद्धा तुम्हाला आयुष्यात मोठा आनंद देऊ शकते”, अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ सर्वांनाच आकर्षित करणारा आहे. हा व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, हा कुत्रा खूप एन्जॉय करत आहे. हा व्हिडीओ सर्वांची मनं जिंकत आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की, आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख २० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : बुरखा घालून मुलगा बाकावर बसला, शेजारी बसलेल्या मुलीसोबत त्याने जे केलं ते पाहून हादरून जाल!
हा व्हिडीओ पाहून लोक कुत्र्याच्या या गोंडस पिल्लाच्या प्रेमात पडू लागले आहेत. प्रत्येक जण या कुत्र्याच्या एनर्जीचं कौतुक करताना दिसून येत आहेत. अनेकांनी तर हा व्हिडीओ पाहून कुत्र्याच्या या पिल्लासोबत असं खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनेक युजर्सनी या व्हिडीओखालील कमेंट्स सेक्शनमध्ये हार्ट इमोजी शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलंय.