Python attacked a man viral video : सरते वर्ष २०२२ ला बायबाय करून आता नवे संकल्प घेऊन २०२३ या नवीन वर्षाला सुरुवात झालीय. गतवर्षी सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहिले असतील. काही माणसं विनाशकाले विपरीत बुद्धीनुसार वागल्याने प्राण्यांच्या जीवघेण्या हल्ल्यात किंवा सर्पदंशाने त्यांचा आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आल्या. या धक्कादायक घटनांमधूनही काही माणसांनी धडा घेतलेला नसेल. कारण एका व्यक्तीचा अजगरासोबत जीवघेणा खेळ करण्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. अजगराला खेळणं समजून त्याच्यासोबत खेळणाऱ्या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडलीय. त्यामुळे सापांसोबत खेळण्याचा संकप्ल कुणी केला असेल, तर आताच सावध होण्याची गरज आहे. कारण हा धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा