सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी अनेक जण व्हिडीओ करण्यासाठी जीव धोक्यात टाकतात. कधी जंगलातील हिंस्र प्राण्यांसोबत मस्ती करण्याचा प्रयत्न काही जण करतात. तर कधी विषारी सापांसोबत खेळण्याचा मुर्खपणाही करतात. सापांना पकडून व्हिडीओ करण्याचा वेडेपणा काही माणसांच्या जीवावर बेतल्याचं अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं आहे. कोब्रा म्हणजचे नागासोबत खेळायला काहींना आवडतं. पण नागाच्या दंशामुळे मृत्यू होईल, याची जराही भीती काही जणांना नसते. अशातच एकाने नाग तर सोडाच किंग कोब्रासोबत खेळ करायचं ठरवलं आणि काही वेळानंतर त्या सापानेही त्याचा रंग दाखवला. हा थरारक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी या भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किंग कोब्रा सापाची आंघोळ करतानाचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहिले असतील. पण सापाच्या जवळ जाऊन त्याला चिडवण्याचा प्रयत्न करण्याऱ्या काही माणसांना जन्माची अद्दल घडल्याचेही समोर आले आहेत. सापांपासून नेहमी दोन हात लांबच राहिलेलं चांगलं, असं म्हणतात. ते सत्यच आहे. कारण सापाच्या मनात काय सुरु आहे आणि तो कोणत्या क्षणी दंश करेल, याचा अंदाज बांधणं कठीण असतं. एक तरुण किंग कोब्रा सापाला पकडण्यासाठी त्याच्या शेपटीला धरतो. त्यानंतप सापाच्या पोटाला धरण्याचा प्रयत्न करतो. पण फणा काढलेल्या किंग कोब्रा संधी मिळताच त्याच्या अंगावर धावतो. मात्र, सुरक्षीत अंतर असल्याने सापाच्या दंशापासून तो तरुण वाचतो.

नक्की वाचा – शांत झोपलेल्या वाघाला नडला अन् क्षणात कुत्र्याला फाडला, थरारक Viral Video पाहून अंगावर काटा येईल

इथे पाहा व्हिडीओ

किंग कोब्रा त्या तरुणाच्या अंगावर धाऊन चावण्याचा प्रयत्नात असतो, परंतु, वेळीच तो तरुण सावध होऊन पाठीमागे जातो आणि सापाच्या दंशापासून त्याची सुटका करतो. हा थरारक व्हिडीओ therealtarzann नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. साडे चार लाखांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. “हा वेडेपणा आहे, पुन्हा असं करु नको, हा माझा चांगला सल्ला आहे.” अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man plays with king cobra after a moment snake gets angry and tries to bite watch shocking viral video nss