King Cobra Viral Video : रील्स बनवून सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी काही जण जीवाचा खेळ करत असल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहे. साप समोर दिसली की अनेकांना अंगावरट काट आल्याशिवायर राहत नाही. कारण सर्पदंशाने माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण काही लोकांना त्यांच्या जीवाची पर्वा नसते. विषारी सापांसोबत खेळ करुन लाखमोलाचा जीव कवडीमोल करण्याच्या प्रयत्न काही माणसं करत असतात. अशाच प्रकारचा एक जीवघेणा खेळ एका तरुणाने केला असून व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून किंग कोब्राचे थरारक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत. आताही एका तरुणाने किंग कोब्रासोबत पंगा घेतला आणि त्यानंतर काही सेंकदातच तो तरुणाच्या अंगावर धावला. हा खतरनाक व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.
तरुणाने स्पर्श करताच किंग कोब्राने मारला फणा, पाहा थरारक व्हिडीओ
किंग कोब्राचा हा धक्कादायक व्हिडीओ Chrisweeet नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एक मुलगा केजमध्ये शांत बसलेल्या किंग कोब्राला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. किंग कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करत असताना काही सेकंदातच कोब्रा तरुणाच्या अंगावर धावून आल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. केजमध्ये असलेल्या या किंग कोब्रा तरुणाने स्पर्श करताच त्याने मोठा फणा काढला. किंग कोब्राने केलेल्या हल्ल्यात हा तरुण थोडक्यात वाचल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
नक्की वाचा – Video: किंग कोब्रासोबत घेतला पंगा, तरुणाने शेपटी पकडल्यावर काही सेकंदातच मारला फणा अन्…
इथे पाहा व्हिडीओ
चिडलेल्या किंग कोब्राने फणा मारल्यानंतर हा तरुण वेळीच सावध झाला. त्यामुळे त्याच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाला नाही. हा व्हिडीओ इतका थरारक आहे की, सापांच्या जवळ जाणं जीवावर कसं बेतू शकतं, याचा दाखलाच या व्हिडीओनं दिला आहे. जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणजे किंग कोब्रा, अशी या सापाची ख्याती आहे. या सापाच्या दंशामुळे माणसाचा जीव वाचवण्याची शक्यत खूपच कमी असते. त्यामुळे अशा विषारी सापांपासून सावध राहण्याचं आवाहन वन विभागाकडून नेहमीच करण्यात येतं.