सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका बाईचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमधून ती बाई स्वत:चा घटस्फोट साजरा करत असल्याचे लक्षात येते. त्या बाईचे नाव शालिनी असून ती फॅशन डिझायनर आहे. त्याशिवाय ती सिनेसृष्टीमध्येही सक्रीय आहे. इन्स्टाग्राम बायोमध्ये तिच्याबाबतची माहिती उपलब्ध आहे. नवऱ्याशी पटत नसल्याने शालिनी लग्न मोडून घटस्फोट घेतला. या निर्णयामुळे होणारा आनंद लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तिने फोटोशूट केले. लग्नापूर्वी फोटोशूट करण्याची फॅशन असताना शालिनीचे डिव्होर्स शूटमधील फोटो व्हायरल होत आहेत. घटस्फोट घेतलेल्या आणखी एका व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. २२ वर्षाचा हा तरुण घटस्फोटाचे सेलिब्रेशन करताना बंजी जंपिंग करायला गेला. हा साहसी खेळ करताना रश्शी तुटल्याने त्याचा अपघात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मिररने दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये राहणाऱ्या राफेल डॉस सॅंटोस टोस्टा या २२ वर्षीय तरुणाचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला. या घटनेमुळे दु:खी न होता स्वत:च्या आनंदासाठी त्याने बंजी जंपिंग करण्याचा निर्णय घेतला. हा साहसी खेळ करण्यासाठी राफेल ब्राझीलमधील कॅम्पो मॅग्रो येथील लागो अझुल (ब्लू लॅगून) येथे त्यांच्या मित्रांसह गेला. सर्व व्यवस्था केल्यानंतर राफेलने तेथील पूलावरुन ब्रिज स्विंग घेण्यासाठी उंचावरुन उडी मारली. पुढे काही सेकंदांमध्ये शरीराला बांधलेली रश्शी तुटली आणि राफेल ७० फूटावरुन खाली पडला.

आणखी वाचा – Video: वाघाला स्पर्श करण्यासाठी तरुणाने पिंजऱ्यात घातला हात अन् तेवढ्यात वाघाने…

उंच ब्रिजवरुन उडी मारुन खाली पडल्यावर राफेलला गंभीर दुखापत झाली. पण सुदैवाने त्याचा जीव वाचला. घटस्फोटाचे सेलिब्रेशन करण्याच्या नादात त्याची मान फ्रॅक्चर झाली तसेच शरीराला इतर जागी इजा झाली. या घटनेनंतर अनेक स्थानिक माध्यमांनी राफेलची मुलाखत घेतली. त्यांना अपघाताबाबत सांगताना राफेल म्हणाला, “मी आधीपासूनच शांत स्वभावाचा आहे. पण अलिकडे काही गोष्टींमुळे माझ्या वागण्यामध्ये खूप बदल झाला होता. घटस्फोट झाल्यानंतर मला जीवनात प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा होता. पण त्या नादात मी खूप जास्त वेडेपणा करत होतो. मला माझ्या जीवाची अजिबात पर्वा नव्हती.”