प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य, आणि सुंदर प्रवास असतो. आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातले भाव सांगणे ही वाटती तितकी सोपी गोष्ट नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी जितके धाडस लागते, तितकेच ते व्यक्त करण्यासाठी कलाही असावी लागते. कारण प्रपोज हा असा क्षण असतो, जो तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल भाव निर्माण करतो. सध्या अशाच एका हटके सरप्राईजची सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे. असं म्हणतात जर प्रयत्न दोन्ही बाजूने असेल तर ते नातं आयुष्यभर टिकत. असाच एक तरुण जो गर्लफ्रेंडला सरप्राईज द्यायला गेला अन् त्यालाच सरप्राईज मिळालं. सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ टेलर स्विफ्टच्या सिंगापूरमध्ये झालेल्या कॉन्सर्टचा आहे, ज्यामध्ये एक तरुण गुडघे टेकून प्रपोज करण्यासाठी आपल्या मैत्रिणीला अंगठी देतो. पण त्यालाच सरप्राईज मिळतं..ते म्हणजे, त्याच्या मैत्रीणीचाही सेम प्लॅन असतो. तरुणीही गुडघ्यावर बसलेल्या तरुणाला अंगठी दाखवते आणि लग्नासाठी प्रपोज करते.हे पाहून दोघे भावूक होतात आणि अंगठी घालून एकमेकांना प्रपोज करतात. तिथे उभे असलेले लोक या प्रेमी युगुलासाठी जोरजोरात टाळ्या वाजवतात. प्रपोज करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की ते व्हिएतनामचे रहिवासी आहेत आणि ८ वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुलं देवाघरची फुलं! चिमुकल्याच्या रुपात देव दिसला; व्हायरल VIDEO एकदा पाहाच…

हा सुंदर क्षण तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे, जो @MustShareNews नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २ लाख ४२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर सुमारे २५ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले…मी या दोघांसाठी मनापासून आनंदी आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… अंगठी चुकीच्या बोटात घातली आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली…प्रपोज करण्याचा सर्वोत्तम क्षण.