Mumbai Flight Viral Video : लग्न सराईचा सीजन सुरु झाल्याने प्रेमीयुगुल एकमेकांना प्रपोज करण्यात व्यस्त असल्याचे व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर येत आहे. प्रेमाला वय नसतं असं म्हणतात, तसंच प्रेमासाठी प्रपोज करायला कोणत्या जागेचंही बंधन नसतं. कारण एका तरुणाने जमिनीवर नाही तर थेट विमान प्रवास करताना त्याच्या प्रेयसीला लग्नाचा प्रपोज केला आहे. हैद्राबाद-मुंबई विमान प्रवास करताना या दोघांचा रोमॅंटिक अंदाज कॅमेराबद्ध झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या कपलच्या रोमॅंटिक अदा पाहून विमानात असलेले प्रवासीही थक्क झाले आहेत. एका तरुणीने त्याच्या प्रेयसीला विमानात सर्व प्रवाशांच्या साक्षीने प्रपोज करुन मोठं सरप्राईज दिल्याचं व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसत आहे. एअर इंडियात विमानात काही प्रवाशांचा गैरवर्तणुकीचा प्रकार उघडकीस आल्याने गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली होती. पण यावेळी एअर इंडियाच्या विमान प्रवासात एक चांगला प्रसंच पाहायला मिळाला.

विमानात तरुणीला लग्नाचा प्रपोज केला अन्…

मुंबईच्या फ्लाईटमध्ये एका व्यक्तीने क्रू मेंबरच्या मदतीनं त्याच्या प्रेयसीसाठी एक सरप्राईज प्लॅन केला होता. त्याचा एका मित्राची केबिन क्रू मेंबरसोबत ओळख होती. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, २ जानेवारीला हे घडलं असून एक महिला प्रवासी लंडनवरून आल्यावर हैद्राबादवरून मुंबईच्या दिशेन विमान प्रवास करणार होती. त्यावेळी प्रेयसीला सरप्राईज द्यायचं, असं त्या तरुणाने ठरवलं होतं. त्यासाठी तरुणाने मुंबई-हैद्राबाद-मुंबई अशी बुकिंग केली होती. कारण त्याला वेडिंग प्रपोजलचा प्लॅन करता येईल. प्रेयसीला प्रपोज करण्याचा त्या तरुणाने प्री प्लॅन केला होता. प्रेयसी विमान प्रवास करत असताना एका मोठ्या गुलाबी पोस्टरला घेऊन तो विमानाच्या गॅलरीत आला. त्यानंतर त्याने त्याच्या प्रेयसीला प्रपोज केला.

Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
cab driver viral video
VIDEO : टॅक्सी चालकाला पोहोचायला ७ मिनिटांचा उशीर, महिलेने घातला राडा; चालकाच्या अंगावर थुंकत म्हणाली…
a unique friendship between a city bus and an auto rickshaw
Video : नेहमी भांडणाऱ्या सिटी बस अन् रिक्षावाल्याचं प्रेम पाहिलं का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी मैत्री फक्त याच शहरात दिसू शकते..”
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
True love Viral Video
‘बायको, तू फक्त साथ दे..’ खऱ्या प्रेमाचं उदाहरण दाखविणारा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट

नक्की वाचा – Video : घराच्या पायरीवरच नागाने काढला फणा, तरुणीने थेट नागाची शेपटी पकडली अन् काही सेकंदातच…

हा रोमॅंटिक व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

तरुणाने पोस्टर दाखवल्यानंतर त्याच्या प्रेयसीला विचारलं, ” मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहू शकतो. जीवनाच्या या प्रवासात तू मला साथ देशील? त्यानंतर ती तरुणी जेव्हा सीटवरून उभी राहिली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. तसेच तो मुलगा त्याच्या डोफ्यांवर बसून प्रेयसीला लग्नाचा प्रपोज करतानाही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एका लिंक्डइन युजरने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मॅरिज प्रपोजल मेड इन हेवन, लव्ह इज इन द एअर,’. कपलचा रोमॅंटिक अंदाज पाहून विमानातील प्रवाशांन टाळ्यांचा गजर वाजवल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

Story img Loader