Mumbai Flight Viral Video : लग्न सराईचा सीजन सुरु झाल्याने प्रेमीयुगुल एकमेकांना प्रपोज करण्यात व्यस्त असल्याचे व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर येत आहे. प्रेमाला वय नसतं असं म्हणतात, तसंच प्रेमासाठी प्रपोज करायला कोणत्या जागेचंही बंधन नसतं. कारण एका तरुणाने जमिनीवर नाही तर थेट विमान प्रवास करताना त्याच्या प्रेयसीला लग्नाचा प्रपोज केला आहे. हैद्राबाद-मुंबई विमान प्रवास करताना या दोघांचा रोमॅंटिक अंदाज कॅमेराबद्ध झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या कपलच्या रोमॅंटिक अदा पाहून विमानात असलेले प्रवासीही थक्क झाले आहेत. एका तरुणीने त्याच्या प्रेयसीला विमानात सर्व प्रवाशांच्या साक्षीने प्रपोज करुन मोठं सरप्राईज दिल्याचं व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसत आहे. एअर इंडियात विमानात काही प्रवाशांचा गैरवर्तणुकीचा प्रकार उघडकीस आल्याने गेल्या काही दिवसांपासून खळबळ उडाली होती. पण यावेळी एअर इंडियाच्या विमान प्रवासात एक चांगला प्रसंच पाहायला मिळाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा