Shocking Video : मृत्यू ही अशी गोष्ट आहे जी कोणालाही चुकलेली नाही. कोणाचा कधी कोणत्या परिस्थितीत मृत्यू होईल हे कोणीच सांगू शकत नाही. यात हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात सकाळी घरातून कामासाठी बाहेर पडलेला व्यक्ती जिवंत घरी येईल याची शाश्वती नसते. चालता-चालतासुद्धा अनेकांचा मृत्यू होतो. काही वेळा एक छोटीशी चूकदेखील मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन जाते. यात अनेकांचा मृत्यू खूप वेदनादायी असतो. एका व्यक्तीच्या वेदनादायक मृत्यूचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये व्यक्तीचा फक्त एक छोटासा निष्काळजीपण कसा त्याला मृत्यूच्या वाटेवर घेऊन गेला हे दिसतेय. मन हेलावून टाकणारी ही मृत्यूची घटना पाहिल्यानंतर आपल्या शत्रूच्याही वाटेला असा मृत्यू येऊ नये असेच तुम्हीही म्हणाल.
काही वेळातच व्यक्ती आगीच्या भक्षस्थानी
घराच्या छतावर चढला अन् मृत्यूने गाठले
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या घराच्या छतावर उभा आहे आणि तिथे ठेवलेली लोखंडी शिडी काढत आहे. यावेळी शिडी पूर्ण बाहेर काढण्यासाठी म्हणून तो ती वरच्या दिशेने खेचत असतो. पण, शिडी पूर्णपणे वरच्या दिशेने खेचत असताना ती छतावरून जाणाऱ्या हाय टेंशन वायरला आदळते. शिडीचा विद्युत वाहिनीला स्पर्श होताच व्यक्तीला अतिशय जोरात विजेचा धक्का बसतो आणि आपल्या डोळ्याच्या पापण्या मिटत नाही तोवर त्याच्या संपूर्ण शरीर पेट घेतले आणि ती व्यक्ती शिडी घेऊन जोरात छतावरून खाली कोसळते. या व्यक्तीने वरती विद्युत वाहिनीची तार असतानाही अतिशय निष्काळजीपणे शिडी वर खेचण्याचा प्रयत्न केला, पण या चुकीमुळेच त्याला आपला जीव गमवावा लागला. मृत्यूच्या या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, देवाने असा मृत्यू कोणाला देऊ नये. दुसऱ्याने लिहिले की, भावा, एआयचे युग आले आहे, आता कोणत्याही व्हिडीओवर विश्वास ठेवण्यासारखा नाही. तिसऱ्याने लिहिले की, हे कोणाच्याही बाबतीत होऊ नये.