Viral video: हत्तींचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. हत्तींचा कळप, त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांचे मजेशीर व्हिडीओही आपलं लक्ष वेधून घेतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि शेअरसुद्धा केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलाय आणि शेअरसुद्धा केला आहे. मात्र, प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. गावाकडं आता हत्ती मानवी वस्तीतही येतात. यावेळी त्यांना त्यांची वाट दिली की ते आपल्याला काही करत नाहीत. मात्र तेच जर आपण त्यांच्या वाटेला गेलो तर मग आपली काही खैर नाही.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लहान मुलं अनेकदा कुत्र्याचं, मांजराचं शेपूट ओढताना तुम्ही पाहिलं असेल, मात्र कधी हत्तीचं शेपूट कुणी ओढताना पाहिलंय का? एकूनच भीती वाटली ना, की एवढ्या भल्यामोठ्या प्राण्याच्या कोण नादी लागणार. मात्र एका मुलानं हत्तीचं असंच मागून शेपूट ओढलं आहे. हा व्हिडीओ ओडीशामधील असून याठिकाणी एका मुलानं हत्तीला विनाकारण त्रास दिला आहे. मात्र त्यानंतर त्याच्यासोबत घडलं ते भयंकर आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच

वन अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “हे सहन करून घेतलं जाणार नाही. एकतर हत्ती तुम्हाला चिरडून टाकेल किंवा आमचा कायदा.”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ओडिशाच्या अंगुलमधील आहे. ही घटना ५ नोव्हेंबर रोजी घडली असून दिलीप साहू असं या मुलाचं नाव, त्याला अटक करण्यात आली आहे

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नियंत्रण सुटल्यानं पेट्रोल पंपावर अपघात; महिलेची स्कूटी थेट तरुणाच्या अंगावर, विचित्र अपघाताचा VIDEO व्हायरल

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @HasnaZaruriHai या पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मिस्कीलपणे लिहिले, “खूप वाईट झाले.”

Story img Loader