एक माणूस बिबट्याला शेपूट धरून ओढत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या २० सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक माणूस बिबट्याला त्याच्या शेपटीने आणि त्याच्या मागच्या एका पायाने पकडलेला दिसत आहे. बिबट्या या माणसाच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अपयशी ठरतो, तर उपस्थित लोक दुरूनच संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करताना दिसतात. व्हिडीओवर लिहिलेल्या एका ओळीत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
परवीन कासवानच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी व्हिडीओ शूट करण्यात आला आहे त्या ठिकाणाचा शोध घेता येत नाही, परंतू या कृत्याचा निषेध केला आणि वन्य प्राण्यांना अशी वागणूक देऊ नये असे सांगितले. त्यांनी लिहिले, “वन्यजीव मित्रांना हाताळण्याचा किंवा त्यांच्याशी वागण्याचा हा मार्ग नाही. ते देखील सजीव प्राणी आहेत. सावधगिरी बाळगा.”
आणखी वाचा : VIRAL VIDEO : ट्रॅफिक सिग्नलवर लेझर तलवारी विकणाऱ्या या व्यक्तीचं टॅलेंट पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल!
हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय. या व्हिडीओला आतापर्यंत ९३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. बिबट्याला माणसाने अशी वागणूक दिल्याने अनेकांना धक्का बसला आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. व्हिडीओमधील व्यक्तीने बिबट्याची शेपटी धरलेल्या माणसाचा उल्लेख करत लिहिले, “प्राण्यांनी टी-शर्ट घालायला सुरुवात केली आहे.” बिबट्या जखमी झाल्याचा संशय एका युजरने व्यक्त केला. त्याने लिहिले, “आणि मला खात्री आहे की, बिबट्या म्हातारा किंवा जखमी असू शकतो. अन्यथा परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती.”
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : पाकिस्तानींनी ‘चप्पल मार मशीन’चा लावला शोध, लोक म्हणाले, “अप्रतिम ऑटोमेशन!”, कमेंट्सचा महापूर!
प्राण्यांना अशी वागणूक देऊ नये, असे आवाहन काही लोकांनी केले. व्हिडीओतील व्यक्तीला शिक्षा व्हायला हवी, असे अनेकांनी आपलं मत व्यक्त केले. बिबट्याबद्दल चिंता व्यक्त करताना एका यूजरने लिहिले की, ‘कृपया सांगा की बिबट्याची तब्येत चांगली आहे का?.’