तुम्हाला गाडी चालवता येत असेल तर पार्किंग हा किती महत्वाचा आणि तितकाच किचकट विषय आहे याचा तुम्हाला नक्कीच अंदाज असेल. म्हणजे गाडी उपलब्ध जागेत दुसऱ्याच्या गाडीला थोडाही धक्का न लावता, नुकसान न करता पार्क करणे आणि पुन्हा तितक्याच सावधपणे ती काढणे हे एक मोठं टास्कच असतं. अनेकांना गाडी शिकल्यानंतर पार्किंगचा अंदाज येण्यासाठी काही वर्षे निघून जातात असंही गंमतीत म्हटलं जात असलं तरी गाडी अगदी व्यवस्थित चालवणारे अनेकजण पार्किंग म्हटलं की थोडे गडबडतात. मात्र पार्कींगमधून गाडी काढणं हा पोरखेळ वाटावा असा एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.

नक्की पाहा >> Viral Video: मोटरसायकल डोक्यावर घेऊन तो घाटातून पायी चालत गेला; लोक म्हणाली, “याला भारताकडून ऑलिम्पिकसाठी पाठवा”

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा

हा व्हायरल व्हिडीओ न्यू यॉर्कमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या एका गाडीच्या पुढे आणि मागे अगदी जवळजवळ गाड्या पार्क करुन इतर लोक निघून गेल्याने आता गाडी बाहेर कशी काढणार. किंवा गाडी काढायची झाली तर समोरची किंवा मागची गाडी काढेपर्यंत वाट पाहत थांबावं लागणार असं वाटतं. मात्र या गाडीचा मालक गाडी जवळ येतो आणि मी आधी याचा फोटो काढून घेतो म्हणत गाडीला खेटून उभ्या केलेल्या गाड्यांचा फोटो काढून घेतो. नंतर तो गाडीत बसतो आणि फुटपाथवरील लोकांना बघा आता मी कशी गाडी बाहेर काढतो असं म्हणून गाडी सुरु करुन स्टेअरिंग हातात घेतो. हळूहळू तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करु लागतो. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या फुटपाथवरील लोकांबरोबरच शुटींग करणारेही हा ही गाडी एवढ्या कमी जागेतून कशी काढणार असा प्रश्न उपस्थित करताना दिसतात.

नक्की पाहा >> …अन् घोडी नवरदेवाला घेऊन वरातीमधून पळून गेली; व्हिडीओ झाला व्हायरल

या गाडीच्या मागे आणि पुढे एवढ्या जवळ कार पार्क करण्यात आलेल्या असतात की इंचभरही इकडे तिकेड झालं, अंदाज चुकला तर समोरच्या गाडीबरोबरच या गाडीचं नुकसानही ठरलेलं होतं. मात्र अवघ्या दीड मिनिटांमध्ये ही व्यक्ती गाडी अगदी हळूहळू चाकं उजवीकडे डावीकडे करत करत गाडी दोन्ही गाड्यांच्या मधून बाहेर काढते.

नक्की पाहा >> Video : उंदीर दिसताच संसदेत नेत्यांची धावपळ; व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

हा मूळ व्हिडीओ टीकटॉकवरचा असून सध्या युट्यूबवरही तो फार पाहिला जात आहे. मागील आठवडाभरामध्ये हा व्हिडीओ दोन लाख ५९ हजार जणांनी पाहिलाय. हा व्हिडीओ शेअर करतानाच त्यावर आश्चर्याने पाहणारे इमोंजी वापरण्यात आले असून टाइट पार्किंगमधून कशाप्रकारे गाडी काढली हो पाहून पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही या इमोंजीप्रमाणे आश्चर्याचे भाव उमटतात हे मात्र नक्की. हा व्हिडीओ पाहून नक्कीच आश्चर्य वाटते मात्र त्याचबरोबरच या चालकाने केलेली करामत पाहून सध्या व्हायरल झालेल्या ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याचा ओळी आठवल्याशिवाय राहत नाही.

Story img Loader