सोशल मीडियाचा या जमान्यात विवाहासाठी इच्छुक व्यक्ती ही आता ऑनलाईन डेटिंग अ‍ॅप्सकडे वळत आहेत. प्रत्यक्ष न भेटता लोकांचा या अ‍ॅप्सच्या माध्यमातून एकमेकांशी ऑनलाईन परिचय होतो, बायोडेटातून आवडी निवडी शेअर केल्या जातात. माहिती पसंत पडल्यास चॅट होते किंवा भेट ठरू शकते. जीवनसाथीचे पर्याय अनेक असल्याने लग्नासाठी इच्छुक अनेक लोक या अ‍ॅप्सना प्राधान्य देतात. मात्र, एका व्यक्तीला असे अ‍ॅप वापरणे चांगलेच अंगावर आले आहे. प्रोफाईलसाठी माहिती देताना त्याच्याकडून चुक झाली. त्याची ही चूक नेटकऱ्यांना पोट धरून हसवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका ३५ वर्षीय व्यक्तीकडून जगातील सर्वात लोकप्रिय डेटिंग अ‍ॅप टिंडरवर नाव टाकताना चूक झाली आहे. त्याचे नाव ‘रे’ असून टिंडरवर रॅट टाकण्यात आले आहे. हे नक्कीच चुकून झाले आहे, कारण या व्यक्तीने चुकीबद्दल स्पष्टीकरण देखील दिले आहे. त्याने आपले नाव ‘रे’ असून ते बदलता येत नाहीये, असे आपल्या बायोमध्ये लिहिले आहे.

(जपानमधील इको फ्रेंडली टॉयलेटची जगात चर्चा, फायदे वाचून तुम्हीही चकित व्हाल)

@NoContextBrits नावाच्या ट्विटर युजरने या व्यक्तीच्या प्रोफाइलचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये फोटोखाली मोठ्या अक्षरात ‘रॅट’ असे लिहिलेले तुम्हाला दिसून येईल. उंदराला इंग्रजीमध्ये रॅट असे म्हटले जाते. त्यामुळे, यावरून नेटकऱ्यांनी या व्यक्तीची चांगलीच मजा घेतली आहे. नाव वाचून नेटकऱ्यांना हसू आवरले नाही.

दरम्यान नाव जरी चुकले असले तरी त्याखाली व्यक्तीने आपल्या बायोमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. आपले नाव ‘रे’ असून आता नाव बदलता येत नसल्याचे तिने लिहिले आहे. मात्र, नेटकरी या व्यक्तीला चांगलेच ट्रोल करत आहे. नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने प्रोफईल पाहून ‘नो कॅट्स अलाउड’, असे कमेंट केले आहे. तर काहींनी मिम्स टाकून या व्यक्तीला ट्रोल केले आहे.

(Viral : बुटात आढळला नाग, काठीने हलवताच चवताळला, पाहा हा थरारक व्हिडिओ)

या ट्विटर पोस्टला ३७ हजार ६०० लाईक्स मिळाले आहेत, तर ट्विट १ हजार ६०० वेळा रिट्विट करण्यात आले आहे. नाव चुकून भलतेच झाले असले तरी देखील नेटकरी या व्यक्तीची थट्टाकेल्यावाचून राहिले नाही. दरम्यान आता झालेल्या चुकी नंतर रॅट या नावाच्या प्रोफाईलसह या व्यक्तीला कुणी जोडीदार मिळेल की नाही, हे काळच सांगेल.