लंडनमधल्या एका पतीने आपल्या बायकोला चक्क विकायला काढले आहे इतकेच नाही तर त्यांने इ-बेवर याची जाहिरात टाकल्यानंतर फक्त दोन दिवसांच्या आतच या पत्नीवर पंन्नास लाखांहून अधिक बोली लागली आहे. वेकफिल्ड येथे राहणा-या ३३ वर्षीय सिमॉनने आपल्या पत्नीचा फोटा या बेवसाईटवर टाकला. आपल्या बायकोला आपल्याप्रती कोणतीच सहानभूती नसल्याने मी तिला विकायला काढतो आहे असे सांगत त्याने पत्नीचा फोटो या साईटवर टाकला. त्याची पत्नी २७ वर्षांची असून लिअँड्रा असे तिचे नाव आहे. तिचा फोटो टाकताना सिमॉनने ‘वापरलेली बायको’ अशी ओळ  लिहली. तसेच आपल्या बायकोला सुमार स्वयंपाक जमतो असेही त्याने या फोटोपुढे लिहले.
‘डेली एक्सप्रेस’ने या संबधीची माहिती दिली आणि या प्रकरणानंतर सगळ्यांनी सिमॉनवर टिका केली. बायको विकायला काढल्यानंतर सगळ्यात कहर म्हणजे जवळपास ५४ लाखांची बोली तिच्यावर लावण्यात आली. ‘लिअँड्रा ही आदर्श पत्नी नाही तसेच आपण थकून कामावरून आल्यानंतर ती आपली सेवा देखील करत नाही. म्हणून तिला विकण्याचे मी ठरवले’ असल्याचे या पतीने सांगतले आहे. आपली पत्नी कधी कधी जेवण सुमार बनवते ते खाल्ल्यामुळे तुम्हाला रुग्णालयात भरती होण्याची वेळ येईल हिला जो विकत घेईल त्याच्या सोबत देवाने राहावे अशी मी प्रार्थना करतो असेही त्याने लिहले आहे.
पण दुसरीकडे त्याच्या बायकोची वेगळीच नाराजी आहे. ‘आपल्या पतीने असे कृत्य केल्यामुळे मला त्याला मारून टाकण्याची इच्छा होत आहे अशी प्रतिक्रिया त्याच्या बायकोने दिली आहे पण त्याचबरोबर त्याने आपला अतिशय कुरूप फोटो टाकला असल्याने ती आणखी भडकली आहे. लिअँड्रा ही ब्युटी थेरिपिस्ट आहे. आपला हा फोटो सगळ्यांनी पाहिला असून आजूबाजूचे सगळेच या प्रकारमुळे पोट दुखून हसत आहेत’ असेही ती म्हणाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा