Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. प्राण्यांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, त्यातील काही व्हिडीओंमध्ये रानटी प्राण्यांचे रौद्र रूपदेखील आपल्याला पाहायला मिळते; तर काही व्हिडीओंमध्ये आपल्या जीवाला धोका असणाऱ्या प्राण्यांसोबतच स्टंट करण्याचा प्रयत्न केला जातो, जो कधीकधी फसतो आणि त्यामुळे काही जणांना दुखापत होते तर काहींना जीवही गमवावा लागतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस बिनधास्त मगरीच्या तोंडात आपला हात ठेवत आहे. हो, याचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. तरुणानं मगरीबरोबर केलेलं हे कृत्य पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
एवढ्या धोकादायक प्राण्याच्या तोंडात बिंधास्तपणे कुणी कसा आपला हात ठेऊ शकतं असं तुम्हालाही वाटेल. आजकालची तरुण पिढी काही तरी तुफानी करण्याच्या नादात स्वत:च्या जिवाचीदेखील पर्वा करत नाही आणि मग कधीकधी आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती मगरीच्या जबड्यात अगदी सहज न घाबरता आपला हात ठेवत आहे. त्याला असं वाटतं होतं की मगर त्याला काही करणार नाही, मात्र पुढच्याच क्षणी मगर त्या व्यक्तीचा हात आपल्या जबड्यात घट्ट पकडते आणि हल्ला करते. त्यानंतर हा तरुण वाईटरित्या जखमी झाल्याचं दिसत आहे, तसेच त्याच्या हातातून रक्त येत आहे; त्यानंतर ही मगर पाण्यात जाते आणि तरुण तिथून निघून जातो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: याला नशीब म्हणाल की आणखी काही? अवघ्या २० सेकंदाने जहाज हुकलं; मात्र शेवटी जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही
तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
सुदैवानं मगरीनं त्या व्यक्तीला खाल्लं नाही किंवा पाण्यात घेऊन गेली नाही. या हल्ल्यामध्ये मात्र त्या व्यक्तीच्या हाताला चांगलीच दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ scorpio_s11__0012 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून अनेकांनी या सगळ्यामध्ये त्या तरुणाला दोषी ठरवत “अरे शेवटी त्यांचाही जीव आहेच की”, “संयमाचा अंत” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत; तर काही जणांनी हे त्याचं काम आहे, तो त्या ठिकाणी त्याचं काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता तुम्हीच आम्हाला सांगा, यात नेमकी चूक कुणाची?