व्हर्जिन ऑस्ट्रेलिया एअरलाईनच्या विमानात एका व्यक्तीने चक्क नग्नावस्थेत धावाधाव करत क्रू मेंबरला त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री पर्थवरून मेलर्बनला जाणाऱ्या विमानात ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी पर्थ विमानतळावर या व्यक्तीला अटक केली आहे.
हेही वाचा – खऱ्या आयुष्यातील Superhero! नदीत बुडणाऱ्या मुलाचा धाडसी तरुणाने वाचवला जीव, Video Viral
द इंडियन एक्सप्रेस सीबीएस न्यूजच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री व्हर्जिन एअरलाईनच्या VA696 विमानाने पर्थवरून मेलर्बनला जाण्यासाठी उड्डाण घेतले. मात्र, उड्डाण घेतल्याच्या काही मिनिटांनंतर विमानातील एका प्रवाशाने नग्नावस्थेत फिरण्यास सुरुवात केली. तसेच त्याने क्रू मेंबर्सला त्रास देण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर क्रूमेंबर्सने याची माहिती पायलटला दिली आणि हे विमान पुन्हा एकदा पर्थ विमानतळावर उतरवण्यात आले.
दरम्यान, पर्थ विमानतळावर लॅंडिंग केल्यानंतर या प्रवाशाला खाली उतरवण्यात आले आणि त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. यासंदर्भात बोलताना पर्थ पोलिसांनी सांगितले, की पर्थ मेलर्बन विमानात एक व्यक्ती नग्नवस्थेत फिरत असल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. त्यानुसार हे विमान पर्थ विमानतळावर उतरताच आम्ही त्याला ताब्यात घेतले. तो मानसिक रोगी आहे का? हे तपाण्यासाठी आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे.
एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीला येत्या १४ जून रोजी पर्थ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र, त्यांच्याविरोधात कोणती कलमं दाखल करण्यात येईल, यासंदर्भात अद्याप माहिती पुढे आलेली नाही.