Uber Ride Turns Nightmare: तुमच्यापैकी अनेकजण उबर ऑटोने प्रवास करत असतील. विचार करा, तुम्ही घाईघाईने उबर ऑटो बुक करुन कामावर निघालाय आणि ऑफिसखाली पोहोचताच तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोचं कोट्यावधीच बिल दाखवलं गेलं तर, धक्का बसेल ना. तुम्हाला हे वाचून हसू येईल, पण एका व्यक्तीबरोबर खरोखर अशी धक्कादायक घटना घडली आहे. दीपक तेनगुरिया या व्यक्तीने उबर अॅपमधून एक ऑटो बुक केली होती, बुकवेळी त्याचे भाडे ६२ रुपये दाखवण्यात आले मात्र प्रवास संपताच भाड्याचे आकडे असे काही वेगाने वाढले की तुम्ही विचार करु शकत नाही. ग्राहकाला १०००, २००० नाही तर चक्क सात कोटींचे बिल दाखवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उबर कंपनीने ग्राहकाला तब्बल ७,६६,८३,७६२ रुपयांचे बिल पाठवले. बिलमध्ये वेटिंग टाइम आणि दुसऱ्या डिटेल्सही देण्यात आल्या आहेत. कंपनीने १,६७,७४,६४७ रुपये ऑटो भाडे आणि वेटिंग टाईमसाठी ५,६६,०९,१८९ रुपये आकारलेत. या बिलात कंपनीने ग्राहकाला ७५ रुपयांची सवलत दिली आहे. या प्रवासासाठी ग्राहकाला कंपनीने ७.६ कोटी रुपये पेमेंट करण्यास सांगितले.

दीपक तेनगुरिया यांनी एक्सवर एक ट्विट करत, या घटनेविषयी माहिती देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यावर उबर कंपनीच्या सपोर्ट बॉटने उत्तर दिलेय. “या घटनेबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला थोडा वेळ द्या, जेणेकरुन आम्ही तुमच्या समस्येचे निराकरण करु, आणि तुम्हाला लवकरच अपडेट करु.” या घटनेमुळे ग्राहकाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.