Petrol pump viral video: पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलू नका, अशी सूचना लिहलेली असते. बऱ्याचदा पेट्रोल पंपावरील कर्मचारी ग्राहकांना हे सांगतात. कधी कधी तर यावरुन पंपावर भांडणंही होतात. पण कुणी ऐकलं तर नवलंच. सध्या पेट्रोल पंपावरील एका व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यात दुचाकीत पेट्रोल भरत असताना दुचाकीस्वाराचा फोन वाजतो त्याच्या खिशातून फोन काढून बोलणार तितक्यात अचानक मोबाईल पेट घेतो. व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा चूक नक्की कुणाची?
व्हिडीओत पेट्रोल पंपावर मोबाईल फोन वापरत असताना एका दुचाकीला अचानक आग लागल्याचे दिसून येते. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ संभाजीनगर जिल्ह्यातील असल्याचे म्हटले जात आहे. संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील बजाज ऑटो गेट समोरील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरत होता. त्यावेळी अचानक त्याच्या मोबाईल कॉल आला. त्यामुळे रिंग वाजली. तो पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा होता. त्याचवेळी दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
चूक नक्की कुणाची?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती तातडीने दुचाकी सोडून बाजूला उभी राहिली व उपस्थित कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंपावर फायर सेफ्टी कॉल सुरू करून आग आटोक्यात आणली. उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. ही धक्कादायक घटना आणि तितकाच भयानक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्हाला जर पेट्रोल पंपावर फोन वापरायची सवय असेल तर सावधान अशा दुर्घटना होऊ शकतात त्यामुळे सतर्क राहाणं गरजेचं आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/C8Evpd_IzlR/?utm_source=ig_web_copy_link
हेही वाचा >> PHOTO: “प्रिय आकाश तु मला प्रपोज केला” शाळेतल्या मुलांचं ‘लव्ह लेटर’ व्हायरल; वाचून पोट धरुन हसाल
हा व्हिडीओ @avani_patil2911 नामक इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी बघितलं आहे.
पंपाच्या परिसरात मोबाइलवर का बोलू नये ?
१. पेट्रोलपंप परिसरात मोबाइलवर बोलणे टाळावे.
२. मोबाइलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे आग लागण्याची शक्यता असते.
३. प्लास्टिक, काचेच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल घेऊन जाणे धोकादायक असते.