शाहरुख खान स्टारर आणि एटली दिग्दर्शित जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट बनला आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले असून जगभरात तब्बल ९०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई करण्यातही यश मिळालं आहे. शाहरुखचे चाहते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या फेव्हरेट अभिनेत्याचं कौतुक करत आहेत. अशातच शाहरुखच्या एका चाहत्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी या तरुणाने चक्क शाहरुख खानचा जवान चित्रपटातील लूक क्रिएट केला. शाहरुखच्या चाहत्याचा हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

@_ak_arbaz_01 नावाच्या यूजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, माझं जवान लूक तुम्हाला कसं वाटलं? प्रतिक्रियांच्या माध्यमातून नक्कीच सांगा…व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, जवान चित्रपटात दाखवलेल्या शाहरुख खानच्या लूकला रिक्रिएट करून तो व्यक्ती ट्रेनमध्ये चढतो. व्हिडीओची सुरुवात त्याच्या डोक्याच्या क्लोज अप सीन्सने होते.

Local Train Shocking Video viral
लोकल ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच; तुमच्याबरोबरही घडू शकेल अशी घटना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”
indian railway handicap passenger break train door
रेल्वे प्रशासन आहे कुठे? अपंग प्रवाशाचे हे हाल तर सर्वसामान्यांच काय? VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य

इथे पाहा व्हिडीओ

या व्यक्तीचा चेहरा आणि हात कापडाच्या पट्ट्यांनी बांधलेला व्हिडीओत दिसत आहे आणि तो अपंग असल्यासारखा दिसत आहे. तो रेल्वे स्टेशनवर असलेल्या बेंचवर बसून ट्रेन येण्याची वाट पाहत असतो. ट्रेन आल्यावर तो व्यक्ती ट्रेनमध्ये चढतो आणि डब्ब्यात सीट शोधू लागतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओला १.८ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओला लोकांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

Story img Loader