एका पुरुषाने वारंवार विनंती करूनही एका गरोदर महिलेला खुर्ची देण्यास नकार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्यक्तीने घडलेला प्रकार स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. Reddit वर त्या व्यक्तीने शेअर केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यावर लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वत:साठी एका व्यक्तीने आणली होती खुर्ची

आपल्या पोस्टमध्ये त्याने सांगितले की त्याच्या पुतण्यांच्या हायस्कूल ग्रॅज्युएशनसाठी रांगे थांबण्याकरिता स्वतःसाठी कॅम्पिंग खुर्ची घेतली होती कारण त्याला संपूर्ण वेळ उभे राहायचे नव्हते.

”माझे पुतणे आज सकाळी हायस्कूलमधून पदवीधर झाले आणि मला समोर बसायचे होते म्हणून मी प्रवेशद्वारासमोर छोटासा तळ ठोकला. माझा शो ऐकण्यासाठी मी माझी फोल्डिंग कॅम्पिंग चेअर आणि माझे हेडफोन आणले आहेत,” असे त्याने पोस्टमध्ये सांगितले आहे.

हेही वाचा : ‘YOU’RE DOING GREAT AND I’M GLAD YOU EXIST’, फोटोत तुम्हाला दिसतोय का हा मेसेज? नसेल तर जाणून घ्या सोपी युक्ती

गर्भवती स्त्री खुर्ची मागितल्यानंतर व्यक्तीने दिला नकार

पण, एक गरोदर स्त्री नंतर रांगेत सामील झाली आणि तिने या व्यक्तीला ‘विनम्रपणे’ विचारले की, त्याची जागा तिला मिळेल का कारण तिला जास्त तास उभे राहणे कठीण होईल. परंतू त्या व्यक्तीने आपली जागा सोडण्यास नकार दिला आणि सांगितले की, त्याला पाय आणि गुडघ्यांचा त्रास असल्याने जागेची जास्त गरज आहे. तरीही महिलेने दुसऱ्यांदा खुर्चीवर बसण्याचा आग्रह धरला आणि तिला पुन्हा तसाच प्रतिसादही मिळाला. यावेळी ती त्याच्यावर थोडी रागावली आणि तेव्हा तिने तिच्या नवऱ्याला हस्तक्षेप करण्यास सांगितले. नवऱ्यानेही त्या व्यक्तीला पुन्हा विनंती केली आणि त्याने त्यालाही नकार दिला.

हेही वाचा – शोधाल तर सापडेल! ‘या’ फोटोत लपलंय एक लबाड मांजर, समोर असूनही दिसणार नाही, १० सेंकदाचं चॅलेज घ्या

सोशल मीडियावर व्हायरल होतेय ही पोस्ट

“शाळेने आम्हाला आत सोडण्याच्या सुमारे ४० मिनिटे आधी, एक गर्भवती महिला माझ्या शेजारी आली कारण तिला कोणीतरी तिला रांगेच प्रवेश दिला (कदाचित तिचा नवरा असाव असे मी गृहित धरले). तिने मला ५ मिनिटांत विचारले (विनम्रपणे विचारले हे कबूल करतो) तिला माझी खुर्ची हवी आहे का कारण तिला संपूर्ण वेळ उभे राहण्यास त्रास होत आहे. त्यावर मी नाही म्हणालो, माफ करा मला त्याची जास्त गरज आहे (मला पाय/गुडघ्यांचा त्रास आहे) आणि माझ्या गोष्टींकडे परत गेलो. तिने मला २ मिनिटात पुन्हा विचारले आणि उत्तर तेच होते. पण, ती माझ्यावर थोडीशी रागावली आणि ती म्हणाली की, ती संपूर्ण वेळ संघर्ष करणार आहे आणि तिच्या जोडीदाराला मला सांगण्यास सांगितले. त्याने मला (विनम्रपणे) विचारले आणि मी पुन्हा माफ करा असे उत्तर दिले परंतु मला त्याची अधिक गरज आहे आणि तिने त्यांच्या कारमध्ये थांबावे किंवा फक्त जमिनीवर बसावे असे सुचवले,” असे पोस्टमध्ये त्याने सांगितले आहे.

हेही वाचा – कुत्र्याला गाडीत लॉक करून गेला मालक, श्वास घेण्यासाठी धडपडत होता बिचारा अन् ….पाहा धक्कादायक व्हिडिओ

”नवरा चिडलेला स्पष्ट दिसत होता. त्यावेळी पतीने मला थेट शिवी दिली परंतु नंतर मला त्याने एकटे सोडले,” असे पोस्टमध्ये त्यांनी तो पुढे म्हणाला.
आता या पोस्टमुळे ऑनलाइन चर्चेला उधाण आले आहे. काहींनी त्या पुरुषाची बाजू घेतली, तर काहींचे मत होते की, त्याने आपली जागा गरोदर स्त्रीला द्यायला पाहिजे होती.

कोण चूक? कोण बरोबर? सोशल मीडियावर सुरू झाला वाद

“तुम्ही आणलेली खुर्ची सोडण्यास नकार दिला कारण तुमच्या स्वतःच्या आरोग्याच्या परिस्थितीमुळे तुम्हाला तिची गरज होती. मला त्या महिलेबद्दल वाईट वाटते, परंतु तिने आणि तिच्या जोडीदाराने स्वतःच्या खुर्च्या आणल्या पाहिजे होत्या आणि त्यांनी तुमच्या वस्तूवर हक्क आहे असे गृहित धरू नये, ”असे एकाने त्याच्या पोस्टला उत्तर देताना लिहिले.

“सभ्य व्हा. आपण फक्त “गर्भवती स्त्री” म्हणू शकता. असे म्हणण्याचे अधिक घृणास्पद आणि अमानवीय मार्ग शोधणे आवश्यक नाही,” दुसर्‍याने लिहिले.

तुम्हाला या प्रकराणाबाबत काय वाटते? चूक कोणाची होती, गर्भवती महिलेची की ‘त्या” पुरुषाची? तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man refused to give up his chair to a pregnant woman viral reddit post sparks debate snk
Show comments