Man Saved A Turtle Stuck In The Rocks : सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. दुसरीकडे समुद्रातही उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत लाटांबरोबर अनेक समुद्री जीवही किनाऱ्यावर वाहत येताना दिसत आहेत. हे जीव पाण्याबरोबर पुन्हा समुद्रात जातात, पण काहीवेळा त्यांना पाण्यात जाणे अवघड होऊन जाते. यात विशेषत: मोठे मासे किंवा मोठे कासव लाटांबरोबर किनाऱ्यापर्यंत वाहत आले तरी त्यांना पुन्हा पाण्यात जाता येत नाही, अशावेळी कोस्टल गार्ड्सच्या नजरेस आल्यास त्यांना जीवदान मिळते, पण नाही तर मग जे तडफडून मरून जातात. अशाप्रकारे एक कासव लाटांबरोबर वाहत आले आणि समुद्राकिनारी असलेल्या दगडांमध्ये जाऊन फसले. पण, एका व्यक्तीमुळे त्याला पुन्हा नवे आयुष्य मिळाले, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत व्यक्तीने ज्याप्रकारे कासवाची मदत केली ते पाहून त्याचे कौतुक होत आहे.

 शिक्षिकेचा शाळेत दारू पिऊन धिंगाणा, मुख्याध्यापकाची पकडली कॉलर अन्…; पाहा धक्कादायक VIDEO

व्यक्तीने कासवाला दिले जीवनदान

सोशल मीडियावर व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वत:ला त्या व्यक्तीचे कौतुक करण्यापासून रोखू शकणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समुद्रकिनाऱ्यावर काही दगडात एक मोठं कासव अडकलं. हे पाहून एका व्यक्तीने त्याला मदत केली. समुद्रात उंच लाटा उसळत असतानाही तो व्यक्ती दगडांवर उतरला आणि कासवाला बाहेर काढले. कासव दगडांमध्ये इतक्या वाईटप्रकारे अडकला होता की, माणसालाही त्याला बाहेर काढणे कठीण झाले होते. कारण ते कासवही वजनाने खूप जड होते. पण खूप कष्ट केल्यानंतर ताकद लावून शेवटी त्या व्यक्तीला कासवाला बाहेर काढण्यात त्याला यश आले. यानंतर त्याने कासवाला अलगद समुद्राच्या पाण्यात सोडले.

“जीव गेला तरी चालेल, तंबाखू खाणं सोडणार नाही” पुराच्या पाण्यात अडकलेल्या बाईकस्वाराचा VIDEO व्हायरल, लोक म्हणाले…

हा व्हिडीओ @shouldhaveanima नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, या व्यक्तीचे हृदय खूप मोठे आहे. आणखी एका युजरने लिहिले की, किती महान माणूस आहे, त्याने कासवाचे प्राण वाचवले. तिसऱ्या युजरने लिहिले की, नायक हेच करतात. शेवटी एका युजरने लिहिले की, काही लोक चांगले असतात.